Ahilyanagar News: महापालिकेने केले 570 दूषित पाणीसाठे नष्ट; 12 हजार घरांची तपासणी

महानगरपालिकेचे डेंगू मुक्त अभियान
Ahilyanagar News
आपत्ती निवारणासाठी महापालिका सज्ज; पावसाळ्यासाठी प्रभागनिहाय कक्ष कार्यरतPudhari
Published on
Updated on

नगर: महापालिकेने हाती घेतलेल्या डेंग्युमुक्त अभियानांतर्गत अहिल्यानगर शहरातील 12 हजार घरांना भेटी देत 36 हजार पाणी साठे तपासण्यात आले. यातील 570 पाणीसाठे दुषित आढळून आल्याने ते तत्काळ नष्ट करण्यात आले.

महापालिकेने सुरू केलेल्या डेंग्यु मुक्त अभियानांतून जनजागृती झाल्याने यंदा केवळ 8 रुग्ण आढळून आले असून मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. गतवर्षी 78 तर त्यापूर्वीच्या वर्षी 98 रुग्णांना डेंग्युची लागण झाली होती. महापालिकेच्या अभियानामुळे यंदा डेंग्यु रुग्ण घट झाल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)

Ahilyanagar News
Ganeshotsav 2025: तीन हजार सार्वजनिक मंडळ, 221 गावांत एक गाव, एक गणपती

चिकनगुनिया, हिवताप, डेंगू आणि मलेरिया हे आजार डासांमुळे होतात. डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू आजार होतो आणि तो स्वच्छ पाण्यात होतो. नागरिकांनी घरात साठवलेले पाणी वेळोवेळी नष्ट करावे आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन डांगे यांनी केले.

शनिवारी सारसनगर परिसरातील अभियानात आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, हभप प्रभाताई भोंग, शिवाजी विधाते, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शिवाजी म्हस्के, जगन्नाथ बोडखे, डॉ. राहुल मुथा, डॉ. संदीप राऊत, डॉ. आयेशा शेख सहभागी झाले.

Ahilyanagar News
Nilesh Lanke: पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

कुमारी तनिष्का चंदेवय 6 वर्षीय बालिकेने डासाची वेशभूषा करून आरोग्यास हानिकारक असल्याबाबत सांगितले. कुमारी अस्मिता इंगळेने गणपतीच्या आरतीमध्ये संसर्गजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. सूत्रसंचालन डॉ. आयेशा शेख यांनी केले तर डॉ. सतीश राजुरकर यांनी आभार मानले.

शंभर कर्मचार्‍यांची यीस पथके

डेंग्यू मुक्त अभियानात 100 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येकी पाच जणांचे वीस पथक कार्यरत असून ते घरोघरी जावून पाणी साठ्यांची तपासणी करत आहेत. दूषित पाणीसाठे आढळल्यास नष्ट केले जात आहे. अभियानाचा अकरावा आठवडा असून 12 हजार घरांतील 36 हजार पाणी साठ्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 570 दूषित पाणीसाठे आढळून नष्ट केले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news