Ahilyanagar LCB Arrest: सोलापूर सराफा लूटप्रकरणातील कुख्यात आंतरजिल्हा गुन्हेगार अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात

पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला १५ दिवसांच्या पाठलागानंतर अटक; दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे व मोबाईल जप्त
Ahilyanagar LCB Arrest
Ahilyanagar LCB ArrestPudhari
Published on
Updated on

नगर: सोलापूर जिल्ह्यामध्ये सराफा व्यापाऱ्याला अडवून १० लाख ५६ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटणारा आणि त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर थेट गोळीबार करून पळून गेलेला कुख्यात आंतरजिल्हा गुन्हेगाराला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतूस व दोन मोबाईल असा एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पावलस कचरू गायकवाड (रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.

Ahilyanagar LCB Arrest
Ahilyanagar Cleanliness Drive: नगरच्या अस्वच्छतेवर आमदार संग्राम जगताप संतप्त; कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, २९ मे २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत जेऊर ते करजगी रस्त्यावरील लकी धाब्यासमोर एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मोटारकार फिर्यादीच्या मोटारसायकलला आडवी लावली. आरोपींनी सुऱ्याचा धाक दाखवून फिर्यादीला जबरदस्तीने मोटारीत बसवले आणि त्यांच्याकडील १० लाख ५६ हजार रुपये किमतीची सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग मारहाण करून हिसकावून नेला. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण पोलिस पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी आरोपी पावलस गायकवाड याने गावठी पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Ahilyanagar LCB Arrest
Sangamner Illegal Parking Fine: संगमनेरमध्ये तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरच दंड; 'कायदा सर्वांसाठी समान' असल्याचे पोलिसांनी दाखवून दिले

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुटकुळे यांनी आरोपीच्या शोधाकामी पथक रवाना केले होते. गोपनीय माहितीनुसार पोलिस पथकाने आरोपीला तिसगाव - मढी रस्त्यावर बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून १ लाख रुपयांचे २ गावठी पिस्तूल, ४ हजार रुपयांची ४ जिवंत काडतुसे आणि ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन असा १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Ahilyanagar LCB Arrest
Pune Nashik High Speed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक; मुख्यमंत्र्यांची पाठपुराव्याची ग्वाही

आरोपी गायकवाड सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पाथर्डी, पारनेर, नवी मुंबई, जालना, सोलापूर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक संदीप दरवडे, कृष्णकुमार सेदवाड, पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, सतीश भवर, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, उत्तरेश्वर मोराळे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

Ahilyanagar LCB Arrest
Rahuri School Bus Accident: राहुरीत विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पलटी; १५ ते २० जखमी, पाच गंभीर

सलग १५ दिवस आरोपीच्या मागावर

स्‍थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक सलग १५ दिवस आरोपीच्या मागावर होते. अखेर २ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की, आकाशी रंगाचा टी-शर्ट घातलेला एक संशयास्पद व्यक्ती तिसगाव शिवारातील मढी देवस्थानकडे जाणाऱ्या गेटवरील कमानीजवळ पाथर्डी रस्त्याच्या दिशेने थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. पोलिसांनी थरारक पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news