Ahilyanagar Cleanliness Drive: नगरच्या अस्वच्छतेवर आमदार संग्राम जगताप संतप्त; कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

कचरा, अतिक्रमण, मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन धारेवर; रोज सकाळी ६ वाजता स्वच्छता मोहिमेचे निर्देश
Ahilyanagar Cleanliness Drive
Ahilyanagar Cleanliness DrivePudhari
Published on
Updated on

नगर: शहरातील वाढती अस्वच्छता, सर्वत्र साचलेला कचरा, अतिक्रमणांचा विळखा, मोकाट कुत्री व जनावरांचा वाढता उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांवर आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि. ३) महापालिकेत बैठक घेतली आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अधिकारी व कर्मचाऱ्यांची खरपडपट्टी काढत शहरातील बिघडलेल्या परिस्थितीचा जाब विचारला. प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना देत कामकुचरापणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.

Ahilyanagar Cleanliness Drive
Sangamner Illegal Parking Fine: संगमनेरमध्ये तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरच दंड; 'कायदा सर्वांसाठी समान' असल्याचे पोलिसांनी दाखवून दिले

या बैठकीत महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक निखील वारे, प्रकाश भागानगरे, अनिल बोरुडे, कुमार वाकळे, बाबासाहेब वाकळे, अनिल ढवण, महेश लोंढे, मयूर बांगरे, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदींनी वेगवेगळ्या समस्या मांडून परिस्थितीची माहिती दिली. उपायुक्त मेहेर लहारे, शहाजान तडवी, अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर, तसेच सर्व विभागप्रमुख, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Ahilyanagar Cleanliness Drive
Pune Nashik High Speed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक; मुख्यमंत्र्यांची पाठपुराव्याची ग्वाही

शहरात पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावे घेतल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आ. जगताप यांनी तत्काळ महापालिकेत येऊन अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेतली. आ. जगताप यांच्यासह महायुतीच्या नगरसेवकांनीही उपायुक्तांसह, अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरीक्षक- कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. सत्ताधारी नगरसेवकांची कामे होत नाहीत, अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत कामचुकारपणा करतात, एक काम दहा वेळा सांगूनही होत नाही, अशी नाराजी सर्वांनी व्यक्त केली.

Ahilyanagar Cleanliness Drive
Rahuri School Bus Accident: राहुरीत विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पलटी; १५ ते २० जखमी, पाच गंभीर

गणवेश घालून काम करावे

ज्या संस्थेचे मीठ खातो त्याप्रती निष्ठा बाळगून दिलेल्या कामाचे कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने पार पाडणे आवश्यक असताना नगरमध्ये विरुद्ध परिस्थिती आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर तसेच अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी रोज गणवेश घालूनच काम केले पाहिजे, असे निर्देश आमदार जगताप यांनी दिले.

...तर अधिकाऱ्यांवर कारवाई

कसूर करणाऱ्या, उद्धटपणे वागणाऱ्या, बेशिस्त व कामचुकार कर्मचाऱ्यांवर एक महिन्याची बिनपगारी सुटी देण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही आमदार जगताप यांनी अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मुत्केकर यांना दिले. यापुढे शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि मोकाट कुत्रे- जनावरांचा प्रश्न प्राधान्याने सोडवून आपत्कालीन परिस्थितीप्रमाणे काम करावे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल, असा इशाराही आमदार जगताप यांना दिला.

Ahilyanagar Cleanliness Drive
Shrigonda Police School Safety: शाळांबाहेर टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांचा धडक अॅक्शन; दोन तरुण ताब्यात

यापुढे रोज सकाळी ६ वाजता...

आ. जगताप म्हणाले, की महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी व स्वच्छता निरीक्षक - कर्मचाऱ्यांनी उद्यापासून रोज सकाळी ६ वाजता नेमून दिलेल्या भागात जाऊन नागरिकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते पूर्ण करावेत. त्या भागात डीप क्लीनसह रस्त्यावरील अतिक्रमणे, दुकानांचे बोर्ड, मातीचे ढिगारे त्वरित काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा. रस्त्यावरील चेंबरचा व गटारांचा सर्व्हे करून त्यावर झाकणे बसवा. झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापून, रस्त्यावर आलेल्या झाडांची छाटणी करा, पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांना पकडा. यासाठी मंजुरीची वाट न पाहता आपत्कालीन परिस्थितीप्रमाणे त्वरित कारवाई करा. केलेल्या कामाचे फोटो काढून वरिष्ठांना व प्रभागाच्या नगरसेवकांना पाठवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news