Ahilyanagar Gas Cylinder Shortage: गॅस सिलेंडर टंचाईमुळे ग्राहकांना रांगा; ग्रामीण भागात गैरसोय

30 ऐवजी 45 दिवसांनी पुरवठा; ग्राहकांची तीव्र नाराजी व बदलाची मागणी
Ahilyanagar Gas Cylinder Shortage
Ahilyanagar Gas Cylinder ShortagePudhari
Published on
Updated on

करंजी: इराण-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडर अथवा व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी कडक उन्हात ग्राहकांना वितरण एजन्सीसमोर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

Ahilyanagar Gas Cylinder Shortage
Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाईची झळ तीव्र; टँकरद्वारे पुरवठा सुरू

नगर तालुक्यातील कौडगाव-जांब येथे घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्याचे दिसून येत आहे. ओटीपी शिवाय सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांना सातत्याने मोबाईल मध्ये ओटीपीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच शहरी भागामध्ये 30 दिवसांनी सिलेंडर मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात 45 दिवसांनी सिलेंडर मिळत असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची देखील मोठी गैरसोय होत आहे.

Ahilyanagar Gas Cylinder Shortage
VRDE Water Pipeline Theft Case: व्हीआरडीईची जलवाहिनी फोडून अनधिकृत नळ जोडणी

ग्रामीण भागात देखील आता रॉकेल अथवा लाकडी सरपण उपलब्ध होत नसल्याने बहुतांश लोक आता सर्रास गॅस सिलेंडरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला देखील 30 दिवसाला गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे, अशी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांची मागणी आहे. अनेक वेळा तांत्रिकदृष्ट्‌‍या ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने ग्राहकांची एजन्सीच्या लोकांशी शाब्दिक चकमक होत आहे.

Ahilyanagar Gas Cylinder Shortage
Ahilyanagar Illegal Diesel Tanker Seized: समृद्धी महामार्गावर 34 हजार लिटर अवैध डिझेल टँकर जप्त

पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने जून महिन्यापासून घरगुती गॅसच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. व्यवसाय सिलेंडरचे भाव देखील मोठे प्रमाणात वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांना देखील गॅस सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ करंजी तिसगाव, मिरी, पाथर्डी या भागातील हॉटेल व्यावसायिकावर येत आहे.

Ahilyanagar Gas Cylinder Shortage
Nevasa Secretary Death: नेवासा हादरवणारी घटना; प्रॉपर्टी वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

तीस दिवसांनी सिलेंडर द्या

ग्रामीण भागात एकत्रित कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घरगुती गॅस मोठ्या प्रमाणात एकत्रित कुटुंबामध्ये वापरला जातो त्यामुळे 45 दिवसाऐवजी 30 दिवसाला ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे, अशी ग्राहकांची मागणी असल्याने अनेक वेळा महिनाभरात गॅस सिलेंडर संपल्यानंतर ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याचे गॅस एजन्सीच्या अधिकृत वितरक उषा कराळे, संगीता अकोलकर यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news