VRDE Water Pipeline Theft Case: व्हीआरडीईची जलवाहिनी फोडून अनधिकृत नळ जोडणी

सहा ठिकाणी चोरीचे कनेक्शन; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
VRDE Water Pipeline Theft
VRDE Water Pipeline TheftPudhari
Published on
Updated on

नगर: वाहन संशोधन आणि विकास संस्थेची (व्हीआरडीई) मुख्य पिण्याच्या पाण्याची वाहिनी फोडून त्यावर सहा ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे. हा प्रकार 20 एप्रिल रोजी घडकीस आला. याप्रकरणी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विठ्ठल मुरलीधर वायकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VRDE Water Pipeline Theft
Ahilyanagar Illegal Diesel Tanker Seized: समृद्धी महामार्गावर 34 हजार लिटर अवैध डिझेल टँकर जप्त

संस्थेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संचालकांच्या आदेशानुसार लष्करी अभियंता सेवेच्या कर्मचाऱ्यांसह 14 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. यावेळी नगर-दौड रस्त्यावरील सॉलिटेअर इमारत परिसरातील नाल्यात तीन ठिकाणी, पांजारपोळ जवळ दोन ठिकाणी आणि कायनेटिक कंपनीच्या पुढे एका ठिकाणी अशा एकूण सहा ठिकाणी चोरून नळ कनेक्शन घेतल्याचे उघड झाले.

VRDE Water Pipeline Theft
Nevasa Secretary Death: नेवासा हादरवणारी घटना; प्रॉपर्टी वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी जलवाहिनी फोडून पाण्याचा गैरवापर केला आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवाली पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news