Ahilyanagar Doctors Strike: बीएचएमएस-सीसीएमपी दुहेरी नोंदणीविरोधात नगरातील डॉक्टरांचा बेमुदत संप; 180 हून अधिक रुग्णालयांतील सेवा ठप्प

ओपीडीनंतर आता बेमुदत आंदोलनाची हाक; जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा, 22 हजार डॉक्टर राज्यव्यापी आंदोलनात सहभागी
Doctors Strike
Doctors StrikePudhari
Published on
Updated on

नगर: वैद्यकीय व्यवसायातील बीएचएमस-सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील ॲलोपॅथी डॉक्टरांनी बुधवारी दिवसभर ओपीडी बंद ठेवली होती. मात्र, शासनाने दुर्लक्ष केल्याने, गुरुवारपासून (दि. ६) शहरातील 180 पेक्षा अधिक हॉस्पिटलमधील डॉक्टर रुग्णसेवा बेमुदत बंद ठेवणार आहेत. गुरुवारी जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Doctors Strike
Ahilyanagar Estimate Committee Visit: अहिल्यानगरात 28 आमदारांच्या अंदाज समितीचा तीन दिवसांचा दौरा; योजनांची पाहणी, प्रशासनाची जय्यत तयारी

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, तसेच सर्व स्पेशालिस्ट संघटनेच्या वतीने झालेल्या या पत्रकार परिषदेत डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. बापूराव कांडेकर, डॉ. निसार शेख, डॉ. अमित करडे, डॉ. मिश्रा, डॉ. वानखेडे, डॉ. झावरे, डॉ. झेंडे आदींनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, की आमचा हा लढा ‘आमच्या वैद्यकीय अधिकारांबाबत नसून, रुग्णसेवेतील संभाव्य धोक्यांबाबत’ आहे.

Doctors Strike
Balasaheb Nahata Arrest: बाळासाहेब नाहटा अटकेने श्रीगोंदा राजकारण तापले; समर्थकांचा राजकीय षडयंत्राचा आरोप

रुग्णांच्या सुरक्षेवर, वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि राज्यातील आरोग्यसेवेच्या विश्वासार्हतेवर दूरगामी परिणाम होणार आहेत. जनतेला कोणत्याही चिकित्सा पद्धतीची दर्जेदार सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, एकाच वेळी होमिओपथी व ॲलोपथी नोंदणी योग्य नाही. आमचा कोणत्याही डॉक्टरांना विरोध नाही, त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने खुशाल प्रॅक्टिस करावी, मात्र शासनाने त्यांची ‘दुहेरी’ नोंदणी करू नये, अशी आमची मागणी असल्याचे डॉ. निसार शेख म्हणाले.

Doctors Strike
Akole New ST Buses: अकोले आगारात 5 नव्या ‘राजमाता जिजाऊ’ एसटी दाखल; पावसाळ्यातील गळक्या बसांच्या त्रासाला ब्रेक

डॉ. कांडेकर म्हणाले, की शहरातील 180 पेक्षा अधिक हॉस्पिटलमधील ओपीडी, तातडीची रुग्णसेवा गुरुवारपासून बंद असेल. मात्र आम्ही सर्व जण रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घेऊ. तातडीच्या उपचारासाठी आमच्याच रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज रुग्णालयापर्यंत रुग्णांना पोहचवले जाईल. प्रसंगी जिल्हा रुग्णालयात जाऊन सेवाही देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Doctors Strike
Shrirampur Agriculture Officer Kidnapping: बोगस खत कारवाईचा सूड! कृषी अधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण; श्रीरामपूर तालुक्यात खळबळ

डॉक्टर आजपासून आझाद मैदानावर

कोर्टात सुनावणी सुरू असतानाही, नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नोंदणी प्रक्रिया थांबवावी, यासाठी आज गुरुवारपासून डॉक्टरांचा हा लढा थेट आझाद मैदानावर पोहचणार आहे. राज्यातील 22 हजारांपेक्षा अधिक डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार असून, नगरचेही डॉक्टर यात असतील, असे डॉ. मिश्रा, डॉ. झेंडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news