Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या बिगरशेती जागेसाठी राष्ट्रवादीकडून सचिन जगतापांचे नाव आघाडीवर

३७ इच्छुकांचे अर्ज; प्रशांत गायकवाड यांची माघार घेत अन्य मतदारसंघातून संधीची मागणी, बिनविरोध की लढत याचा फैसला २१ तारखेला
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा बँकेच्या बिगरशेती मतदारसंघाची एक जागा ही राष्ट्रवादीलाच जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र यंदा उमेदवार बदलाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन अरुणकाका जगताप यांच्या नावावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र ३७ इच्छुकांचे अर्ज पाहता ही जागा बिनविरोध होणार की लढत? हे मात्र २१ तारखेलाच समजणार आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Development Plan: नगरच्या प्रारूप विकास आराखड्यावर साडेआठशे हरकती!

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी मजूर फेडरेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक नगरमध्ये घेतली. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने सचिन जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचा दावा जगताप समर्थकांनी केला आहे. जगताप यांचे पारडे जड झाल्याचे दिसताच याच जागेवर गतवेळी संचालक झालेले प्रशांत गायकवाड यांनीही बिगरशेतीतून माघार घेत, अन्य मतदार संघातून संधी मिळावी, अशी मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Drought: ‘साहेब, आता तुम्हीच आमचे देव!’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्त हाक

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातील दोन जागा बिनविरोध झाल्या असून अन्य तीन जागा बिनविरोधाच्या मार्गावर आहेत. बिगरशेती मतदारसंघातून एक संचालक निवडून दिला जातो. गतवेळी ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने यंदाही ती विखे-थोरात सहमतीच्या राजकारणात राष्ट्रवादीलाच सोडली जाणार आहे.

Ahilyanagar District Bank
Kopargaon Water Supply: कोपरगावात आता सहा दिवसांआड पाणीपुरवठा; पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

प्रशांत गायकवाड यांनी याच मतदासंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मजूर फेडरशेनच्या बैठकीत मात्र गायकवाड यांनी या जागेवरील दावा सोडल्याचे समजते. त्या बदल्यात ‘ओबीसी’ किंवा महिला राखीवमधून पत्नीसाठी संधी द्यायला हवी, असा आग्रह बैठकीत धरला. यावेळी ‘तुमच्याबाबत चर्चा झाली असून, तुमचे नाव श्रेष्ठींकडे पाठवले आहे’ अशी गायकवाड यांची समजूत काढण्यात आली.

Ahilyanagar District Bank
Jamkhed Encroachment: अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तू-तू, मैं-मैं...

३७ अर्ज, बिनविरोध होणार कशी?

बिगरशेती मतदारसंघात नंदकिशोर औताडे, वसंत लोढा, दत्ता पानसरे, रावसाहेब रोहोकले, प्रतापसिंह पाचपुते, प्रतीभ पाचपुते, शरद झोडगे, बाळासाहेब तापकिर, राजेंद्र नागवडे, धनलक्ष्मी हजारे यांच्यासह ३७ इच्छुकांचे अर्ज दाखल झालेले आहेत. यातील धनलक्ष्मी अदिनाथ हजारे हे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निकटवर्ती मानल्या जातात. त्यांच्यासाठी प्रा. शिंदे यांनी आग्रह धरला तर मात्र निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. विस्थापितांना विचारात घेतले तरच ही जागा बिनविरोध होऊ शकते. मात्र त्यासाठी २१ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या मतदारसंघात १५९२ मतदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news