Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या राजकारणात नवे समीकरण? शरद पवारांच्या भेटीसाठी विस्थापित नेते एकवटले

विस्थापितांचा निर्धार; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे नेते शरद पवारांना भेटणार
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रस्थापितांविरोधात लढणाऱ्या विस्थापितांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पाठबळ मिळविण्यासाठी गुरुवारी नगरमध्ये बैठक घेतली. बैठकीत ११ पेक्षा अधिक जागा लढण्याचा निर्धार केला.

खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वात शिवसेना, काँग्रेसमधील विस्थापितांचे शिष्टमंडळ शरद पवार यांच्या भेटीला पोहचणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.

Ahilyanagar District Bank
Pune MLC Election: अर्जमाघारीचा आज शेवटचा दिवस; शरद लाडांची माघार, डॉ. स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या जिल्ह्यातील प्रस्थापितांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सपशेल ‘बेदखल’ केले. ज्या बँकेची सत्ता शरद पवार यांना विचारल्याशिवाय कधीच झाली नाही, त्याच बँकेत आज शरद पवारांचा पक्ष ‘बाहेर’ ठेवल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या.

बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुजय विखेंना सोबत घेऊन केलेले हे ‘राजकारण’ शरद पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी विस्थापित १२ ऑक्टोबरला गोविंदबागेत धडकणार आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणात थोरात व विखे एकत्र आल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसचा एक गट एकत्र आला आहे.

Ahilyanagar District Bank
Shrirampur Accident: तिचे प्रसंगावधान मृत्यूला पराजित करते तेव्हा...भरधाव ट्रकने उडवले आणि स्कूटीवरून उडूनही तिने हिमतीने वाचवला जीव

या गटाची पहिली बैठक नगरमध्ये झाली. खासदार नीलेश लंके, शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार राहुल जगताप, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, अरुण कडू, प्रताप शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, हर्षदा काकडे, शिवशंकर राजळे, बाळासाहेब हराळ, अमित भांगरे, बाळासाहेब साळुंखे, सुधीर म्हस्के, एकनाथ घोगरे, अमृत धुमाळ, किरण कडू उपस्थित होते.

जिल्हा बँक ही सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांची आहे. मात्र ही बँक ठरावीक कारखानदारांची व भांडवलदारांची झाली आहे. त्यामुळे प्रस्थापितांविरुद्ध ही निवडणूक लढवावी, अशी सामान्य सभासदांचीही भावना आहे. त्यासाठी समविचारी उमेदवारांना सोबत घेण्याचा निर्धारही खा. लंके, लोखंडे आणि ढाकणे यांनी बैठकीतून व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news