Ahilyanagar Voter List: अहिल्यानगर शहर मतदारसंघात ६८,८४६ मतदारांची वगळणी; ४४ हजार मतदारांना सुनावणीच्या नोटिसा

२ लाख ४६ हजार ४२४ मतदारांची प्रारूप यादी जाहीर; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन
Voter List
Voter Listpudhari photo
Published on
Updated on

नगर: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील ६८ हजार ८४६ मतदारांची वगळणी करुन नव्‍याने २ लाख ४६ हजार ४२४ मतदारसंख्‍या असलेली प्रारुप मतदारयादी प्रसिध्‍द केली आहे. या मतदारयादीत समावेश असलेल्‍या मात्र, मॅपिंगशी जुळणी न झालेल्‍या आणि विसंगती असलेल्‍या ४४ हजार ६९ मतदारांना लवकरच नोटिसा बजावून सुनाणीसाठी बोलावले जाणार, असल्‍याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.

Voter List
Ahilyanagar Bhuikot Fort: अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा; शासन-लष्कराचा सामंजस्य करार

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत शहर मतदारसंघातील ३ लाख १५ हजार २६४ मतदारांना बीएलओंच्‍या माध्‍यमातून गणना प्रपत्र वाटप करण्‍यात आले होते. त्‍यापैकी २ लाख ४६ हजार ४१८ मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन प्राप्‍त झालेअसून, त्‍या अर्जाचे डिजीटायझेशन करण्‍यात आले. २१.८४ टक्‍के म्‍हणजे ६८ हजार ८४६ मतदारांकडून बीएलओंना प्रपत्र भरुन प्राप्‍त झाले नाहीत.

Voter List
Ahilyanagar Ganeshotsav: अहिल्यानगरात ‘व्यसनमुक्त गणेशोत्सवा’चा संकल्प; DJ वाजविताना नियम मोडल्यास कारवाई

त्‍यांना वगळून २ लाख ४६ हजार ४२४ मतदारांची प्रारुप मतदारयादी प्रसिध्‍द करण्‍यात आली. यामध्‍ये १ लाख २२ हजार ४ महिला, १ लाख २४ हजार ३९२ पुरुष तर २८ इतर मतदारांचा समावेश असल्‍याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी मंगळवारी (दि.१) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) सुधीर उबाळे उपस्‍थित होते.

Voter List
Kukadi Project: कुकडी प्रकल्पाला ५,७०४ कोटींची मंजुरी; डिंबे-माणिकडोह बोगद्याचा मार्ग मोकळा

प्रारुप मतदारयादीत नावे आहे. मात्र मॅपिंगमध्‍ये २००२मधील मतदारयादीशी जुळणी झालेली नाही तसेच काही विसंगती असलेल्‍या ४० हजार ६९ मतदारांना बीएलओंच्‍या माध्‍यमातून नोटिसा बजावून महासैनिक लॉन येथे सुनावणीस बोलावले जाणार आहे. त्‍यांनी जन्‍मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा सादर केल्‍यास त्‍यांचे नाव अंतिम मतदारयादीत ठेवले जाणार आहेे. नागरिकांनी प्रारुप मतदारयादीचे अवलोकन करुन ३० सप्‍टेंबरपर्यंत दावे व हरकती सादर कराव्‍यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Voter List
MHT CET Data Leak: MHT-CET डेटा लीकचा गंभीर आरोप; विद्यार्थ्यांचा खासगी डेटा विकल्याचा दावा, अहिल्यानगरात मोर्चा

वगळणी मतदार घटक

  • मयत : १४८७७

  • स्‍थलांतरित : २९८५९

  • दुबार : ६६७२

  • गैरहजर : १७५३५

  • इतर १०३

वगळणी मतदारांची नावे वेबसाईटवर

वगळण्‍यात आलेल्‍या मतदारांची नावे आणि कारणे असलेली यादी अहिल्‍यानगर महापालिकेच्‍या वेबसाईटरवर तसेच अहिल्‍यानगरच्‍या वेबसाईटवर प्रसिध्‍द केली आहेत. यामधील स्‍थलांतरित मतदारांना नाव नोंदणी करायची असल्‍यास, त्‍यांनी नमुना ६ नंबरचा अर्ज भरुन द्यावा. त्‍यानंतर चौकशी करुन तो राहात असल्‍याचे सिध्‍द झाले तरच ४ नोव्‍हेंबर रोजी प्रसिध्‍द होणार्‍या अंतिम मतदारयादीत नाव समावेश केले जाईल, असे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news