Ahilyanagar Disability Certificate Verification: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वादानंतर तपासणी पुन्हा सुरू

संप मागे; एका दिवसात ६५० हून अधिक नागरिकांची दिव्यांग तपासणी, जिल्हा रुग्णालयात गर्दी
Fake Disability Certificate
Fake Disability CertificatePudhari
Published on
Updated on

नगर: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात आम्हाला नाहक बदनाम केले जात असल्याची खंत व्यक्त करत गेल्या आठवड्यात कामकाज बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी काल बुधवारी मात्र पुन्हा नियमितपणे दिव्यांग तपासणी केली. काल 650 पेक्षा अधिक नागरीकांची दिव्यांग तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात आली.

Fake Disability Certificate
Dhorjalgaon Sand Mining Issue: वाळू व खनिज तस्करी धोक्यात

जिल्ह्यात काही दिवसांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याचे धागेदोरे जिल्हा रुग्णालयासोबत जोडले जात आहे. मात्र, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही बाब खटकल्याने त्यांनी गेल्या बुधवारच्या नियमित दिव्यांग तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे अनेकांना माघारी परतावे लागले आहे.

Fake Disability Certificate
Ahilyanagar Mazi Wasundhara Award: माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हाचा प्रथम क्रमांक

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यानंतर हा संप दुसऱ्याच दिवशी मागे घेण्यात आला. त्यामुळे काल बुधवारी दिव्यांग तपासणी सुरू असल्याचे पहायला मिळाले.

Fake Disability Certificate
Ghodegaon Taluka Formation: घोडेगाव, राजूरला होणार अपर तहसील कार्यालय

सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या गर्दीमुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाल्याचे दिसले. त्यामुळे दिवसभराची ओपीडी देखील 650 च्या पुढे गेल्याची दिसली. डॉ. घोगरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा दिव्यांग मंडळाचे डॉ. पाठक, डॉ. संदीप कोकरे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. सुप्रिया सोनवणे, डॉ. सोनाली बांगर, डॉ. कराळे आदींच्या टीमने दिवसभर दिव्यांग तपासणी करत त्यांच्या प्रमाणपत्रासह अन्य बाबींविषयी कार्यवाही केल्याचे दिसले.

Fake Disability Certificate
Rahuri Wedding Gold Theft Solved: राहुरीत 6 लाखांच्या लग्नातील दागिन्यांची चोरी उघड; मध्यप्रदेशात जाऊन पोलिसांची धडक कारवाई

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांना सन्मानजनक वागणूक देतानाच आवश्यक त्या सुविधा द्याव्यात, असाही सूर आळवला जात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news