Bhingar Crime: भिंगारमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; जुन्या वादातून दोघांवर गुन्हा

वादाचे रूपांतर मारहाणीत; पती-पत्नीला धमकी, पोलिस तपास सुरू
Axe
AxePudhari
Published on
Updated on

नगर: भिंगारजवळील आलमगीर परिसरातील ब्रम्हनगर येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला केला केला. ही घटना 1 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Axe
Sangamner Land Fraud: संगमनेरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे जमीन फसवणूक; सहा जणांवर गुन्हा

याबाबत अशोक बन्सी गायकवाड (रा. देवकृपा कॉलनी, आलमीगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. बुधवारी रात्रीच्या सुमारास आरोपी राजू कुऱ्हाडे आणि मयूर राजू कुऱ्हाडे हे संगनमत करून गायकवाड यांच्या घरासमोर आले. तुमच्यामुळे माझ्या मुलीला त्रास होतो, असा आरोप करत आरोपींनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.

Axe
Pathardi Investment Scam: पाथर्डीत गुंतवणूक फसवणुकीचा भंडाफोड; समर्थ क्रॉप केअरकडून 2 कोटींचा गंडा

यावेळी आरोपीने हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने अशोक गायकवाड यांच्या पाठीवर मारहाण प्रहार केला. पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नीमध्ये आली असता, आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार डी. पी. मोरे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news