Gram Panchayat Reservation: जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींची प्रारूप आरक्षण सोडत जाहीर; २५ जूनपर्यंत हरकतींची संधी

२०२४ ते २०२६ कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी आरक्षण यादी प्रसिद्ध; अंतिम आरक्षण १० जुलैला जाहीर होणार
Gram Panchayat
Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यातील १ जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्‍या ८४३ ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.१९) प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. यावर नागरिकांकडून २५ जून २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागविण्‍यात आल्‍या आहेत. उपलब्‍ध हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभागनिहाय आरक्षण १० जुलैला प्रसिद्ध होणार आहे.

Gram Panchayat
Water Scarcity Management: अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी ३० सप्टेंबरपर्यंत राखीव; विखे पाटील यांचे निर्देश

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणार्‍या ७७० ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना पूर्ण झाल्‍यानंतर राज्‍य निवडणूक आयोगाने २६ मे रोजी या ग्रामपंचायतींबरोबरच २०२४ व २०२५ या दोन वर्षात मुदत संपलेल्‍या ९९ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतही नव्‍याने काढण्‍याचे निर्देश दिले होते.

Gram Panchayat
Sugar Factory Election: ज्ञानेश्वर कारखाना बिनविरोध; वृद्धेश्वरमध्ये दोन जागांसाठी रंगतदार लढत

अनुसूचित चाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जात असल्‍यास, नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण कमी करून एकत्रित आरक्षण ५० टक्‍के मर्यादेत आणण्‍याचे निर्देश आयोगाने दिले होते.

Gram Panchayat
Illegal Liquor Raid: १८ दिवसांत ७२ लाखांची अवैध दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

त्‍यानुसार जिल्‍हा प्रशासनाने १० ते १२ जूनदरम्‍यान, अकोले तालुक्‍यातील २६ ग्रामपंचायती वगळता उर्वरित ८४३ ग्रामपंचायतींच्‍या आरक्षण सोडतीसाठी त्‍या त्‍या गावांत ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढली. गावांतील ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये तसेच पंचायत समित्यांमध्‍ये शुक्रवारी (दि.१९) प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण यादी प्रसिद्ध केली आहे.

२५ जूनपर्यंत उपलब्‍ध हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. ३ जुलैपर्यंत अभिप्रायासह अहवाल जिल्‍हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. ८ जुलैपर्यंत जिल्‍हाधिकारी मान्‍यता देतील आणि त्‍यानंतर अंतिम प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध होईल.

Gram Panchayat
Rahata Molestation Case: विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर

ग्रामपंचायतींची संख्‍या

अकोले ४०, संगमनेर ९४, श्रीरामपूर २९, कोपरगाव ३२, राहाता २६, राहुरी ४७, नेवासा ८५, अहिल्‍यानगर ६७, पाथर्डी ८३, कर्जत ७५, शेवगाव ५४, जामखेड ५१, पारनेर ९१, श्रीगोंदा ६९.

ओबीसीसाठी जास्‍तीत जास्‍त चार जागा आरक्षित

आरक्षण मर्यादेची अंमलबजावणीसाठी आयोगाने सदस्‍य संख्‍या निश्‍चित केली . त्‍यानुसार ७ सदस्‍यसंख्‍या असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये जास्‍तीत जास्‍त १ जागा, ९ ते ११ सदस्‍यसंख्‍या असलेल्‍या ग्रामपंचायतींमध्‍ये २ तर १३ सदस्‍यसंख्‍या असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये ३ जागा ओबीसीसाठी आरक्षित झाल्‍या आहेत. १५ ते १७ सदस्‍यसंख्‍या असलेल्‍या ग्रामपंचायतींमध्‍ये चार जागा नागरिकांच्‍या मागास प्रवर्गांसाठी निश्‍चित करण्‍यात आलेल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news