5.5 Foot Iguana: पाने-फळे खाणारा साडेपाच फुटांचा शाकाहारी सरडा; वयानुसार बदलतो रंग

धनगरवाडीतील श्री गंगागिरी कृषी प्रदर्शनातील आकर्षण
5.5 Foot Iguana
5.5 Foot IguanaPudhari
Published on
Updated on

पुणतांबा: श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भरविण्यात आलेल्या श्री गंगागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात साडेपाच फूट लांबीचा शाकाहारी ग्रीन इगुआना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भव्य आकार, वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना आणि पाठीवरील काटेरी शल्कांमुळे हा परदेशी सरडा प्रदर्शनातील आगळेवेगळे आकर्षण ठरला आहे.

5.5 Foot Iguana
Mula Dam Water Release: मुळातून आजपासून खरिपासाठी आवर्तन; आवक मंदावली, धरण अजूनही न भरल्याने चिंता

या सरड्याचे शास्त्रीय नाव इगुआना असून त्याला कॉमन ग्रीन इगुआना किंवा अमेरिकन इगुआना असेही म्हटले जाते. ही प्रजाती प्रामुख्याने मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियनमधील उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळते. शेपटीसह त्याची लांबी सुमारे दोन मीटरपर्यंत पोहोचू शकते.

मोठे डोके, गळ्याखालील त्वचेचा पडदा, मानेपासून शेपटीपर्यंत पाठीवर असलेली काटेरी शल्कांची रांग, मजबूत पाय आणि लांब शेपटी ही ग्रीन इगुआनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे हा मोठ्या आकाराचा सरडा प्रामुख्याने शाकाहारी असून पाने, फुले, फळे आणि विविध वनस्पती त्याच्या आहाराचा भाग आहेत.

वयानुसार बदलतो रंग

वयानुसार होणारा रंगबदल ग्रीन इगुआनाचे एक वैशिष्ट्य आहे. लहान वयात ग्रीन इगुआनाचा रंग प्रामुख्याने हिरवा आणि उठावदार असतो. प्रौढ अवस्थेत तो हिरवा, करडा, तपकिरी किंवा मिश्र छटांमध्ये दिसू शकतो.

5.5 Foot Iguana
Ahilyanagar District Cooperative Bank: जिल्हा बँक शेतकऱ्यांची की साखरसम्राटांची? १२ सहकारी कारखान्यांकडे तब्बल २७०० कोटींचे कर्ज

प्रौढ ग्रीन इगुआनाचे वजन साधारण ७ ते ९ किलो असते; मात्र मोठ्या आकाराच्या नरांचे वजन त्यापेक्षा अधिक असू शकते. सप्ताहस्थळी या ग्रीन इगुआनाचे आकर्षक फ्लेक्सही लावण्यात आले असून, त्याची वैशिष्ट्यपूर्ण छबी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्री गंगागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, विविध कृषी साहित्य, शेतीची अवजारे आणि कृषीविषयक विविध उपक्रमांची माहिती शेतकरी व नागरिकांना दिली जात आहे. हे प्रदर्शन २५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news