

जामखेड: खर्डा पोलिस ठाणे हद्दीत जातेगाव शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लक्ष्मण प्रभू गायकवाड याच्यासह 40 जणांना अटक करत मोबाईल, वाहने यांसह 37 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व जण पत्त्यांवर पैसे लावून तिरट हा जुगार खेळताना आढळले. (Latest Ahilyanagar News)
अटक केलेल्यांमध्ये जामखेड तालुक्यातील बाळासाहेब खाडे (वय 50), मारुती गिते (वय 48), विक्रम शिंदे (वय 50), पोपट राजगुरू (वय 37), रावसाहेब राजगुरु (वय 35), अशोक गिते, नितीन गिते (वय 38, सर्व रा. दिघोळ), बाळासाहेब नेटके (वय 63), रामचंद्र राळेभात (वय 70, दोघे जामखेड), अजय सकट (वय 38), रवींद्र भुते (वय 36), किरण गोलेकर (वय 42), संतोष साळुंके (वय 45, चौघे खर्डा), लक्ष्मण गायकवाड (वय 45), दादासाहेब गायकवाड (वय 60, जातेगाव), गणेश दौंड (वय 39, दौंडाची वाडी), पंडित दाताळ (वय 36, वाकी), शंकर आवारे (वय 40, माळेवाडी), धोंडीबा येळे (वय 45, मोहरी), यांच्यासह जिल्ह्यातील जुगाऱ्यांचा समावेश आहे.
खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोहिमेत खर्डा, शेवगाव आणि एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत एकूण 38 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.