

नगर : श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर व नगर तालुक्यांत मंगळवारी पावसाने दाणादाण उडवून दिली. जिल्ह्यात सरासरी 14.6 मि.मी. नोंद झाली. वादळी वार्यासह झालेल्या या पावसाने 26 गावांतील 246.75 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, बाजरी, गहू, भोपळा, टोमॅटो तसेच आंबा, केळी, संत्रा, खरबूज आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अकोले तालुक्यातील सर्वाधिक 190 हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 49 मि.मी. पाऊस झाला आहे. चिंभळा, अरणगाव व मिरजगाव महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे पाच तालुक्यांतील ओढे- नाले वाहिले असून, छोटे बंधारे भरले आहेत. (Ahilyanagar News Update)
जिल्ह्यात तिसर्या दिवशी मंगळवारी (दि.20) पावसाने हजेरी लावली. संगमनेर, अकोले, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर या नऊ तालुक्यांत अत्यल्प म्हणजे सरासरी 3.7 मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, उर्वरित पाच तालुक्यांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यांतील सर्वच अकरा महसूल मंडलांत सरासरी 20 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. चिंभळा मंडलात 87.3 मि.मी. पाऊस झाला. कर्जत तालुक्यात आठ मंडलांत 20 मि.मी.पेक्षा अधिक नोंद झाली.
मिरजगाव मंडलात 69.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जामखेड तालुक्यातील चार मंडलांत 24 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला असून, अरणगाव मंडलात 84.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पाच तालुक्यांतील ओढे- नाले वाहिले असून, छोटे बंधारे भरले आहेत. या वादळी पावसाचा नऊ तालुक्यांतील 26 गावांतील 246.76 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 576 शेतकर्यांना बसला आहे. कृषी विभागाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविला आहे.
चिंभळा : 87.3, अरणगाव : 84.8, मिरजगाव : 69.5, श्रीगोंदा : 61.3, काष्टी : 55.3, देवदैठण : 52, भानगाव : 49.8, आढळगाव : 49.8, लोणी व्यंकनाथ : 48, माही : 47.5, सुपा : 47.5, वाडेगव्हाण : 47.3, कोंबळी : 45.3, नेप्ती : 44.5, जामखेड : 42.8, कुळधरण : 38, खेड : 36.3, बेलवंडी : 36, पेडगाव : 34.8, मांडवगण 34.3.
नगर : 20.5, पारनेर : 21.7, श्रीगोंदा : 49, कर्जत : 35.9, जामखेड : 28.3, शेवगाव : 2.4, पाथर्डी : 1.9, नेवासा : 3.9, राहुरी : 1.5, संगमनेर : 1.7, अकोले : 3.1, कोपरगाव : 5.8, श्रीरामपूर : 6.7, राहाता : 6.4.
अहिल्यानगर : 7.60 (15), पाथर्डी : 1.25 (4), कर्जत : 7 (9), श्रीगोंदा : 5.2(5), जामखेड : 2 (5), नेवासा : 27.30 (52), अकोले : 190 (474), कोपरगाव : 5.4 (9), संगमनेर : 1 (3).