

नगर: भारत स्वतंत्र्यानंतर भारत पाकिस्तान फळणी झाली. त्यामुळे काही मुस्लिम बांधव पाकिस्तानात गेले तर, काही भारतच राहिले. पुढे त्यांचे नातेगोते असल्याने सोयरिकी झाल्या. दोन्ही देशात शांततपूर्ण वातावरण असताना त्यांचे ये-जाणे झाले. पण परिस्थिती तणावग्रस्त झाल्याने ते इथ राहिले आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिसा असल्याने जिल्ह्यातच राहणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
जम्मू-काश्मिर राज्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला. त्यात देशातील सुमारे 28 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानबरोबरचे व्यापारासह सर्व संबंध तोडले आहेत. तर, देशात विविध प्रकारच्या व्हीसा घेऊन वास्तव्य करणार्या नागरिकांना तत्काळ देश सोडून पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Ahilyanagar News)
त्यानुसार प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यातील पाकिस्तांनी नागरिकांची तपासणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 14 पाकिस्तांनी नागरिक आढळून आले आहेत. त्यात 13 महिला असून, एक पुरूष आहे.
मात्र, या नागरिकांमध्ये एक तरुण व्यक्ती नाही. भारत पाकिस्तान फाळणीनंतर काही मुस्लिम बांधव पाकिस्तानमध्ये गेले तर काही भारत देशात राहिले. मात्र, त्याचे नातेसंबंध असल्याने ये-जाणे सुरू होते. परिणामीम पुढे त्यातील काही पाकिस्तांनी हिंदू-मुस्लिम महिलांचा भारतीय पुरूषांशी विवाह झाला. त्यामुळे त्या सासरी भारतात आल्या. मात्र, त्यांना दीर्घकालीन व्हिसा मिळाला होता. आजमितीला त्या सासरी सुखाने नांदत आहेत. मात्र, त्यांचे नागरिकत्व पाकिस्तानीच आहे.
सुमारे 2018 पर्यंत त्यांचे पाकिस्तानला ये-जा सुरू होती. मात्र, पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर त्यांचे पाकिस्तानात जाणे बंद झाले. तर, पुलवामाचा हल्ल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात एकही पाकिस्तांनी नागरिक आलेला नाही.
दरम्यान, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम घेतली असता जिल्ह्यात सुमारे 14 पाकिस्तानी नागरिक आढळून आले. त्यात सुमारे सहा हिंदू असून, 8 मुस्लिम आहेत. त्यापैकी 13 महिला असून, एक पुरूष आहे. त्या सर्वांकडे दीर्षकालीन व्हिासा असल्याने ते सर्व भारत देशात राहू शकतात. शॉट टर्म व्हीसा असणार्यांना पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
वंशावळ लागत नाही...
जिल्हा प्रशासनाने काही पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केले होते. मात्र, त्यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. कारण नागरिकत्व देण्यासाठी ते सर्वच कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.