अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण

सिडको : अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना सुधाकर बडगुजर समवेत मयुर पाटील ,देवानंद बिरारी यांसह आदी ( छाया : राजेंद्र शेळके) 
सिडको : अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना सुधाकर बडगुजर समवेत मयुर पाटील ,देवानंद बिरारी यांसह आदी ( छाया : राजेंद्र शेळके) 
Published on
Updated on

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकली. त्या कुशल प्रशासक, आचरणाने अत्यंत पवित्र व स्वाभिमानी होत्या. उचित न्यायदानासाठीही त्या प्रसिद्ध होत्या, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. पुतळ्यास छत्री बसवून देण्याचे दिलेले आश्वासनही त्यांनी पूर्ण केले आहे.

सिडकोत रायगडचौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास बडगुजर आणि पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अहिल्याबाई यांचा जीवन परिचय करून देतांना बडगुजर बोलत होते. रायगड चौकातील पुतळ्यास छत्री बसवून मिळावी या आशयाचे निवेदन धनगर समाजाच्या वतीने देण्यात आल्यानंतर बडगुजर यांनी त्याची लगेचच पूर्तता केल्याने धनगर समाजाच्या नेत्यांनी बडगुजर यांना धन्यवाद दिले. छत्री बसविण्याचा कार्यक्रम सिडकोचे विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, सचिन राणे, राजेंद्र नानकर, सुभाष गायधनी, संजय भामरे, सुनील भामरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमास दादाजी अहिरे, नाना पाटील, नाना निकम, रमेश उघडे, पवन मटाले, भास्कर जाधव, साहेबराव कोळपे, राजेंद्र हलवर, साहेबराव डोंबाळे, किरण थोरात, राजेंद्र शिंदे, हरिभाऊ आढाव, पंकज जाधव, राहुल पाटील, अर्जंन खाटेकर, रमेश जावरे, डॉ. महेश निकम, विष्णू भुरे, आबा हिरे, प्रकाश खिंवसरा, गोपीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते .

सिडकोत रायगड चौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुर्णाकृती पुतळ्याळा छत्री बसवावी या मागणीचे निवेदन समाजाच्या वतीने देण्यात आले होते. दोन दिवसात  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुर्णाकृती पुतळ्याळा छत्री बसवुन दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख , शिवसेना ( ठाकरे गट).

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news