जळगाव : ‘पनवेल एक्सप्रेस’मधून ६७ हजारांचा ऐवज लंपास करणारा चोरटा गजाआड

जळगाव : ‘पनवेल एक्सप्रेस’मधून ६७ हजारांचा ऐवज लंपास करणारा चोरटा गजाआड
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

पनवेल एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या महिलेची पर्स लांबविणार्‍या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी सहा तासात गजाआड केले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल रवींद्र भोवते (वय ३८, रा.आरपीडी रोड, द्वारकानगर, भुसावळ) असे अटक केलेल्‍या संशयित आराेपीचे नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील अंधेरी ईस्ट या भागातील रहिवासी मोहंमद अहमद अब्दुल गनी (वय ३५) हे कुटुंबासह मंगळवारी पनवेल एक्स्प्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करत होते. ही गाडी भुसावळ जंक्शनवर थांबली. मोहंमद अहमद अब्दुल गनी याच्या पत्नी वॉशरुमला गेल्या तर मोहंमद अहमद अब्दुल गनी हे प्लॅटफॉर्मवर उतरले होते. याचा फायदा घेत चोरट्याने मोहंमद गनी यांच्या पत्नीची पर्स चोरली. त्यामध्ये असणारे 57 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 10 हजार रूपयांचा मोबाइल असा अंदाजे एकूण 67 हजार रूपयांचा ऐवजांवर डल्‍ला मारत धूम ठोकली. काही वेळात भुसावळ स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर ही बाब मोहंमद गनी यांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेबाबत नाशिक येथे तक्रार दिली.

पोलिसांनी त्याबाबतची चौकशी करत अमोल रवींद्र भोवते (वय ३८, रा.आरपीडी रोड, द्वारकानगर, भुसावळ) याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने केलेल्या चोरीची कबुली दिला. पाेलिसांनी सर्व मुद्‍देमाल जप्‍त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकिसन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील इंगळे, भरत शिरसाठ, हवालदार जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, अजित तडवी, सागर खंडारे, आरपीएफचे उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार शुक्ला, आरक्षक भूषण पाटील, भजनलाल यांनी केली.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news