रामदास आठवले यांनी घेतली नाशिकच्या साळवे कुटुंबाची सांत्वनपर भेट

रामदास आठवले यांनी घेतली नाशिकच्या साळवे कुटुंबाची सांत्वनपर भेट

पिंपळगाव बसवंत पुढारी वृत्तसेवा : चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भरीव काम केले. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळाली. मला मिळालेले मंत्रीपद आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाढलेली ताकद या देशातील सर्वसामान्य रिपाई कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

निफाड तालुक्यात रिपाईचे रविंद्र जाधव व महेंद्र साळवे दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे आकस्मित निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या परिवारातील सांत्वन पर भेट घेण्यासाठी रामदास आठवले हे निफाड तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी रिपाई लोकअध्यक्ष महेंद्र साळवे यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, रिपाईचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी साळवे कुटुंबियांचे विचारपूस करून सांत्वन केले. श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हॉटेल रुचा येथे जिल्हा संघटक भारत गांगुर्डे व नंदू गांगुर्डे यांनी रामदास आठवले यांचे तिसऱ्यांदा  मंत्रिपद मिळाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, युवा नेते भूषण लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, भाजपचे सतीश मोरे, जेष्ठ नेते अशोक गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, राजेंद्र साळवे, गुड्डू सय्यद, गौतम पठाडे, विनोद शिंदे, सुदेश गांगुर्डे, बाळासाहेब गांगुर्डे, विशाल दोंदे, संजय मोरे, चंदन सुरळकर, रमजान शेख, अविनाश केदारे, विवेक  साळवे, अँड.सचिन गांगुर्डे, अंकुश केदारे, कय्युमभाई पठाण, आलीम शेख, तात्या अहिरे, नरेश जाधव, विकार शेख, प्रकाश गांगुर्डे या सह रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news