खडसे-महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार : ना. रक्षा खडसे

खडसे-महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार : ना. रक्षा खडसे
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भा केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील, आणि योग्य वेळी एकनाथ खडसे यांचा प्रवेश होईलच असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर भुसावळ व मुक्ताईनगर या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी  माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टीसोबत जेवढे लोक जोडतील तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढेल.

एकनाथ खडसे हे भाजप मधील जुने नेते आहेत. त्यामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र येऊन काम केलं. तर, जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. गेल्या चार-पाच वर्षापासून मी दोघांचा संघर्ष बघत आहे. परंतू, माझी त्यांनी एकत्र यावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.

पुढे त्या म्हणाल्या, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. ते एकत्र होते तेव्हा, त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याता विकास झाला आहे. आरोप-प्रत्यारोप थांबवून त्यांनी एकत्र आल पाहिजे. गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन  काम केलं तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचा विकास होईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news