Jalgaon Lok Sabha | भाजपच्या स्मिता वाघ तब्बल एक लाख मतांनी आघाडीवर

Jalgaon Lok Sabha | भाजपच्या स्मिता वाघ तब्बल एक लाख मतांनी आघाडीवर

जळगांव पुढारी वृत्तसेवा – जळगाव लोकसभेमध्ये महायुती भाजपा उमेदवार स्मिता वाघ व महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत होत आहे.  मतमोजणी सुरु असून आठव्या फेरीअंती तब्बल एक लाख दहा हजार 278 मतांनी स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली आहे.

जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना 2,35,548 मते मिळाली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार करण पवार पाटील यांना एक लाख 26 हजार 270 मते मिळालेली आहे. यात एक लाख दहा हजार 278 मतांनी वाघ यांनी आघाडी घेतलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news