Lok sabha Election 2024 Results : जळगाव- रावेर दोन्ही जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

Lok sabha Election 2024 Results : जळगाव- रावेर दोन्ही जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

जळगाव-  जळगाव व रावेर लोकसभेची मतमोजणी सुरु असून रावेर लोकसभेच्या पाचव्या फेरीमध्ये भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांनी 65,846 मतांनी आघाडी घेतली असून  जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ यांनी 86 हजार 381 मतांनी आघाडी घेतलेली आहे. दोन्ही लोकसभेमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहे.

रावेर लोकसभेच्या पाचव्या फेरी अंती श्रीराम पाटील यांना 70094 मते पडलेली आहे. तब्बल 65 हजार 846 मतांनी रक्षा खडसे यांनी आघाडी घेतलेली आहे.
तर जळगाव लोकसभेमध्ये सातव्या फेरीमध्ये स्मिता वाघ यांना एक लाख 79 हजार 43 मध्ये मिळाली आहे. तर करण पवार पाटील यांना 92 हजार 662 मते मिळाली असून सातव्या फेरीअंती 86,381 मतांनी स्मिता वाघ आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news