रामदेववाडी प्रकरणातील फिर्यादीचा पोलीस अधीक्षकांना अर्ज, नवीन खुलासे

file photo
file photo

जळगाव- रामदेव वाडी अपघात प्रकरणातील मूळ फिर्यादी राजेश चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक अर्ज दिला आहे. त्यामध्ये घटना घडली त्यावेळेला काही महत्वपूर्ण गोष्टी फिर्यादीत सांगण्याचे राहून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार नव्याने दिलेल्या अर्जातून अजून काही मुलांची नावे फिर्यादीने स्पष्ट केली आहे. तसेच घटनेच्या दिवसापासून सर्वांचे मोबाईलचे डीसीआर तपासावे व सीसीटीव्ही तपासावे अशी मागणी दिलेल्या अर्जातून फिर्यादीने केली आहे.

तालुक्यातील रामदेव वाडी प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादी राजेश चव्हाण यांनी गुन्ह्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी सुटून गेल्याचे म्हटले आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी यांना त्यांनी अर्ज दिला आहे. या अर्जामध्ये म्हटले आहे की, अपघातावेळी आढळलेला गांजा सदृश्यपदार्थ नसून तो गांजाच होता अशी खात्री आहे. इको स्पोर्ट गाडीसोबत अजून एक गाडी होती. त्यामध्ये एक मुलगी सुद्धा होती असा खुलासा त्या अर्जामध्ये फिर्यादी चव्हाण यांनी केला आहे. तसेच त्या मुली सोबत सुमित मुथा यांचा मुलगा आदित्य मुथा हा देखील होता तसेच एल एस पाटील यांचा नातू हा सुद्धा होता. काही वेळानंतर एल एस पाटील अपघातात स्थळावर आल्याचे पोलिस अधीक्षकांना फिर्यादीने दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

दुसऱ्या गाडीमध्ये एलएस पाटील यांचे नातू आदित्य मुथा यांचा मुलगा व एक मुलगी असे होते असे अर्जामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. घटनेच्या दिवसापासून आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय लोकांचा पोलिसांवर मोठा दबाव होता. 7 मे पासून आज पर्यंत आरोपींची व त्यांच्या परिवारांचे सीडीआर पोलिसांनी तपासावे म्हणजे सत्य बाहेर येईल अशी सुद्धा मागणी या अर्जाद्वारे केली आहे. तसेच या रस्त्यावरील ढाबे, हॉटेल ,कॉम्प्लेक्स, दुकाने या आजूबाजूची सीसीटीव्ही सुद्धा तपासण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.

ज्या मुलांना पोलिसांनी अटक केली होती त्यांना शासकीय वाहनाने किंवा रुग्णवाहिकेने मुंबईला दवाखान्यात नेणे होते का त्यांना जिल्ह्यात सोडण्याची परवानगी पोलीस अधीक्षक त्यांच्याकडून घेतली होती का आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना खाजगी वाहनाने विना पोलीस परवाने कसे मुंबईत ऍडमिट झाले हा प्रश्न त्यांनी या अर्जातून उपस्थित केला आहे

अर्णव कॉल हा नामांकित वकील एस के कौल बडतर्फ कार्यकारी अभियंता जि. प जळगाव यांचा नातू आहे. तसेच आदित्य मुथा हा मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचा असून सुमित मुथा हे गिरीष महाजन यांचे पार्टनर आहे असाही दावा या अर्जात त्यांनी केला आहे. तिन्ही मंत्र्यांचा दबाव पोलिसांवर असल्यामुळे त्यांना 17 दिवस अटक करण्यात आलेली नव्हती असेही या अर्जात फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचे निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी या अर्जातून करण्यात आलेली आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news