नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; २६ जूनला मतदान | पुढारी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; २६ जूनला मतदान

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ३१ मेपासून त्याची नोटिफिकेशन जारी होणार आहे. अर्ज भरण्याची ७ जून ही शेवटची तारीख आहे. तर अर्ज माघार घेण्याची तारीख १२ जूनरोजी आहे. २६ जूनला मतदान होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील १३ हजार ०५६ शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात 26 जूनला मतदान होणार असून मतमोजणी ही १ जुलैला होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 13 हजार 56 मतदारसंघ नाशिक विभागात 64 हजार 002 मतदार एकूण मतदार आहेत. शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी जळगाव जिल्ह्यातील 20 ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असतील.

हेही वाचा  

Back to top button