Nashik News | बारावीत कमी गुण मिळाल्याने सिडकोतील विद्यार्थ्याने संपवले जीवन

Nashik News | बारावीत कमी गुण मिळाल्याने सिडकोतील विद्यार्थ्याने संपवले जीवन

सिडको : पुढारी वृत्तसेवा- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तणावात येत एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष गुलाब पाटील (१८, रा.उत्तम नगर शिवपुरी चौक सिडको) याचा बारावीचा निकाल लागला. त्यामध्ये त्याला ५९ टक्के गुण मिळाले होते. परंतु, हवे तसे गुण न मिळाल्याने तो तणावात गेला होता. याच दरम्यान आई गावाला व वडील कामावर गेलेले असताना गुरुवारी (दि. २३) रात्री पावणे आठ वाजता त्याने किचन मधील सिलिंगच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. याप्रकरणी पीयूषचे काका ज्ञानेश्वर आधार पाटील यांनी अंबड पोलिसांना कळविले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या पश्चात आई. वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आवारे करीत आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news