Ramdev Wadi Accident Case | रामदेववाडी अपघात प्रकरणातील दोघांना 27 पर्यंत पोलिस कोठडी | पुढारी

Ramdev Wadi Accident Case | रामदेववाडी अपघात प्रकरणातील दोघांना 27 पर्यंत पोलिस कोठडी

जळगांव पुढारी वृत्तसेवा- पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात एका बिल्डरपुत्राने दोन अभियत्यांचा जीव घेतल्यानंतर पुणेकरांना रान पेटवलं, अन् तेथील यंत्रणा खऱ्या अर्थाने जागी झाली. त्या घटनेनंतर जळगावच्या रामदेववाडी येथील अपघाताचे गांभीर्यही लक्षात आलं. जळगाव मध्ये 7 मे रोजी झालेल्या अपघाताच्या घटनेतील  तपासी अधिकारी बदलण्यात आला. त्यानंतर दोघांना मुंबई येथून अटक करुन ताब्यात घेण्यात आलं. त्यांना आज न्यायालयात  हजर केले असता नायालयाने त्यांना 27 तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली.

जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी या ठिकाणी 7 मे रोजी  कार-मोटरसायकलचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. अपघातात पुण्यातील संशयित हे जखमी झाल्यामुळे त्यांना मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने व त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर तपास अधिकारी बदलण्यात येऊन त्या ठिकाणी डीवायएसपी संदीप गावित यांची नियुक्ती करण्यात आली. सदर घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक टीम मुंबई येथे पाठवून दि. 23 रोजी दुपारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. आज दि. 24 रोजी संशयित अर्णव कौल व अखिलेश पवार यांना दुपारी पोलीसांनी न्यायालयात हजर केले. डी वाय एस पी व तपास अधिकारी संदीप गावित यांनी त्यांच्या 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.

यावर प्रकाश बी पाटील यांनी हरकत घेतली.  त्यांनी फिर्यादीवरच दिलेल्या फिर्यादीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फिर्यादीला दुसऱ्या व्यक्तीने सांगण्यावरून ही माहिती दिलेली आहे. त्या गाडीमध्ये चार जण होते. त्यापैकी दोनच जणांना या न्यायालयात आणलेले आहे. यातील चालक कोण असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दोन मुलांचा तपास पोलिसांनी करावा या न्यायालयात गाडी चालवण्यात असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही.  म्हणून मनुष्यवधाचा गुन्हा हा कायद्याचा अतिरेक आहे असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यांना हा गुन्हा नोंदवता येत नाही असेही त्यांनी यावेळी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले.

दोन्ही संशयित आरोपींना मारहाण झालेली आहे. त्याविषयी कोणाचीही काही करत नाही. या दोन्हीविरुद्ध कारवाई सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. तसेच न्यायालयात हे सांगण्यात आले की, मुंबई येथील आझाद पोलीस स्टेशनने यांचा जबाब घेतलेला आहे.

तर अखिलेश पवार यांच्याकडून बाजू मांडताना सागर चित्र म्हणाले की, या गुन्ह्यातील अटक ही बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यात 304 हा गुन्हा लागूच होत नाही. 24 तारखेला आरोपींना अटक करतात मग यांनी 14 ते 15 दिवस मुंबईत रुग्णालयात असताना त्यांना अटक का केली नाही. त्याची विचारपूस का नाही केली. गाडीत बसणे म्हणून 304 चा गुन्हा दाखल होत नाही असा दाखला त्यांनी दिला.

Back to top button