HSC Result : मातोश्री सोनवणे शैक्षणिक संकुलात १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव | पुढारी

HSC Result : मातोश्री सोनवणे शैक्षणिक संकुलात १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अंदरसुल; पुढारी वृत्तसेवा : येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ची धवल यशाची परंपरा कायम राखली. यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. तसेच सहकार व शिक्षण महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या संस्थेचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक वाकचौरे श्रेयश संदीप ८३.८३% काळे राजनंदिनी पंकज ८३.८३% उदार तनुजा गणेश ८३.८३% द्वितीय क्रमांक जैन ओजल महेंद्र ८३.६७ % तृतीय क्रमांक नाजगड वर्षा बाळकृष्ण ८२.८३% चतुर्थ क्रमांक भागवत दिव्यानी वेणुनाथ ८२.१७% कापसे सौम्या बाळकृष्ण ८२.१७% पंचम क्रमांक सोनवणे भाग्योदय रंगनाथ ८१.५० टक्के.

तर वाणिज्य शाखेचा १००% निकाल लागला असून प्रथम तांदळे प्रियांका मारुती ८६.८३% द्वितीय क्रमांक घाडगे मानसी रवींद्र ८२.५०% तृतीय क्रमांक रोहम निकिता पुंडलिक ८१.३३% चतुर्थ क्रमांक खैरनार योगिता बाळू ७८.००%
पंचम क्रमांक हाडोळे युवराज नंदकिशोर ७७.५०% कला शाखेचा ९२% निकाल लागला असून प्रथम पटेकर श्रुती संतोष ६३.१७% द्वितीय भागवत कुणाल बाळकृष्ण ६१.८३% तृतीय सोमासे विशाल गणेश ६०.५०% चतुर्थ खडके अविष्कार बबन ६०.००%, पंचम खतीब तोहिब मुनीरअली ५९.००% आदी विद्यार्थी उपस्थित होते. त्याच बरोबर नामदेव काळे, मारुती तांदळे, बाळू खैरनार, पुंडलिक रोहम, डॉ. महेंद्र जैन, वंदना कापसे , बाळकृष्ण नाजगड, वेणुनाथ भागवत, रंगनाथ सोनवणे, आदी पालकांचा सत्कार करण्यात आला.

विज्ञान शाखेत विशेष प्राविण्यासह ३२ विद्यार्थी उत्तीर्ण विज्ञान शाखेत प्रथम श्रेणीत ७१ विद्यार्थी
वाणिज्य शाखेत विशेष प्राविण्यासह ६ विद्यार्थी उत्तीर्ण वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी तथा संचालक राजेंद्र गायकवाड, संचालक उज्वल जाधव, आकाश सोनवणे, रामनाथ एडाईत, जनार्दन जानराव, नामदेव काळे, महेंद्र जैन, मारुती तांदळे, सौ वंदना कापसे, रंगनाथ सोनवणे,बाळकृष्ण नाजगड संदीप वाकचौरे , प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्रिन्सिपल अल्ताफ खान, भागवत मयूर, बोडरे संदीप, भाटे विजय, टेके मयुरी, शिंदे वैशाली, गणेश सोनवणे, शिवप्रसाद शिरसाट, सचिन घोडके, आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयूर भागवत यांनी केले व संदीप बोडरे यांनी आभार मानले.

Back to top button