Jalgaon News | कुणाला मानधन कुणाला नाही, बीएलओंनी व्यक्त केला संताप; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Jalgaon News | कुणाला मानधन कुणाला नाही, बीएलओंनी व्यक्त केला संताप; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव : नुकतेच लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान जळगाव जिल्ह्यामध्ये झाले. यात नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ यांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. तसेच त्यांना अल्पशा मानधन मिळाले तर कोणाला मानधनही मिळाले नाही असा संताप व्यक्त करत त्यांना योग्य मान सन्मान मिळावा व योग्य मानधन मिळावे याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातून काय केली मागणी ?

  • कुणाला मानधन मिळाले तर कुणाला मिळालेच नाही.
  • काहींना अगदी कमी मानधन मिळाले.
  • योग्य मान सन्मान मिळावा व योग्य मानधन मिळावे अशी मागणी निवेदनातून केली.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान (दि. 13) ला पार पडले. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून या निवडणुकीसाठी काम करत आहे. मात्र 13 दिवस अहोरात्र काम करूनही मोबदला शून्य मिळाला. काहींना अल्प मोबदला मिळाला. तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पन्नास रुपये मोबदला देण्यात आल्याचे निवेदन दि. 15 जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.  प्रत्येक मतदाराला मतदाना साठी प्रवृत्त करण्यासाठी बीएलओंनी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र तेच मतदानापासून वंचित राहिले व जिल्ह्याची मतदारांची टक्केवारी जी वाढलेली आहे ती या शिक्षकांच्या भूमिकेमुळे वाढल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याची खंत

दहा तारखेला झालेल्या बैठकीत जेवण, नाश्ता व पाणी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. मात्र जळगाव ग्रामीणच्या भागांमध्ये अशी कोणतीही सुविधा मिळाली नाही. वार्षिक मानधन सुद्धा बी एल ओ यांना मिळालेले नाही. मतदान केंद्रावर दोन स्वयंसेवक मंजूर केले होते. त्यातील एकाला मानधन मिळाले तर दुसऱ्याला मानधन हे खिशातून  द्यावे लागले असेही सांगितले. त्यांना सफाई कामगारांना देण्यात आलेल्या मानधना एवढे मानधन देण्यात आले अशी ओरड केली. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भेटून त्यांना निवेदन दिले.

निवेदन देताना यांची उपस्थिती

यावेळी नितीन सोनवणे, गणेश पाटील, आर के जोशी, एल बी कवाडे, विजय चौधरी, केजी पाटील, एस व्हि सोलंकी, ए व्ही कोळी, व्हाय के पाटील ,एस के पांडे, व्ही आर पाटील, दिलीप शिंपी, अनिल चौधरी, संजय कोटक, किरण कोळी. दिनेश चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news