Jalgaon Lok Sabha : संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 36 वरुन 3 वर, जिल्हा प्रशासनाचे यश | पुढारी

Jalgaon Lok Sabha : संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 36 वरुन 3 वर, जिल्हा प्रशासनाचे यश

जळगाव- जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी 2024 लोकसभेची संपूर्ण तयारी पूर्ण केलेली आहे. मात्र पोलीस प्रशासनाने गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीपूर्वी कारवायांची संख्या कमी आहे. 2024 मध्ये 9 एम पी डी ए ची सर्वाधिक कारवाई जळगाव पोलिसांनी केली आहे. संवेदनशील केंद्र कमी करण्यात जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला मोठे यश आलेले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी आपल्या परीने तयारी केलेली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 36 ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्रे होती. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कामामुळे जळगाव जिल्ह्यातील 36 संवेदनशील केंद्रांवर तीन संवेदनशील केंद्रे राहिलेली आहेत. त्यामध्ये दोन जळगाव लोकसभेत व एक रावेर लोकसभेमध्ये आहे.

पोलीस प्रशासनाने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधक कारवाई केलेले आहेत.
2019 मध्ये सी आर पी सी 107 – 4408, सी आर पी सी109-75,सी आर पी सी 110- 596,सीआरपीसी149- 2310, बी पी अक्ट 55 – 04,बी पी अक्ट 56— 57,बी पी अक्ट 57–20,बी पी अक्ट u/s93—- 297, एम पी डी ए –०

2024 मध्ये सी आर पी सी 107 – 3132, सी आर पी सी109-62 ,,सी आर पी सी 110- 499, ,सीआरपीसी149- 2239,, बी पी अक्ट 55 – 02 ,,बी पी अक्ट 56— 37 ,बी पी अक्ट 57–2 ,बी पी अक्ट u/s93—- 278 , एम पी डी ए –9

2019 मध्ये सर्व कारवाई मध्ये आघाडी असताना फक्त एम पी डी ए ही कारवाई करण्यात आलेली नव्हती मात्र 2024 मध्ये 2019 पेक्षाही कारवाई कमी झालेल्या असून 2024 मध्ये नऊ जणांवर एम पी डी ए कारवाई करण्यात आलेली आहे. 2024 मधली सर्वात मोठी कारवाई आहे .

हेही वाचा –

Back to top button