Dhule News | पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती, दुकानदारांनी मागितली आठ दिवसांची मुदत | पुढारी

Dhule News | पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती, दुकानदारांनी मागितली आठ दिवसांची मुदत

पिंपळनेर : (जि.धुळे )पुढारी वृत्तसेवा – पिंपळनेर नगर परिषदेसमोर झालेले अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन नोटिसा देऊनही दुकानदारांनी अतिक्रमण न काढल्याने, बुधवारी प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र,दुकानदारांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागून घेतल्याने, अतिक्रमण मोहीम तूर्त स्थगित करण्यात आली. दरम्यान, अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्यात आलेली असली तरी दुकानदारांना दुकाने सुरू करून व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

नगर परिषदेसमोर जवळपास 13 दुकानदारांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले आहे. व्यावसायिकांनी हे अतिक्रमण काढून घ्यावे, यासाठी नगर परिषदेतर्फे त्यांना यापूर्वी दोन नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, नगर परिषदेच्या नोटिसांना व्यावसायिकांनी केराची टोपली दाखविल्याने, नगर परिषदेने बुधवारी अतिक्रमण काढण्याची तयारी केली. त्यासाठी जेसीबी, दोन ट्रॅक्टरसह पोलिस व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार ठेवण्यात आला होता. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची तयारी सुरू करताच व्यावसायिकांनी नरमाईचे धोरण स्वीकारले.

नगर परिषद प्रशासक दीपक पाटील यांनी या अतिक्रमणधारकांना स्पष्ट केले की, ती जागा तुमची नाही, ते अतिक्रमण आहे. यावर व्यावसायिक म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करीत आहोत. त्यानंतर नगर परिषदेतर्फे दुकानदारांना वेळोवेळी अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले. तरीही त्यांनी अतिक्रमण न काढल्याने, नगर परिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर दुकानदारांनी आठ दिवसांची मुदत मागून घेतली. दरम्यान, दुकान खाली करण्यासाठी, तसेच सामान काढण्यासाठीच दुकानदारांना दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला.

हेही वाचा –

Back to top button