Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन | पुढारी

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – आगामी लोकसभा निवडणूक व येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी पोलिसांनी शहरातून शिस्तबद्ध रित्या पोलीस व सी आय एस एफ जवान यांच्या वतीने संचलन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी शहरात संचलन करण्यात आले. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक, मारुती मंदिर, मोठा वाडा परिसर, पालखेड रोड, शिवाजी नगर, जुना कळवण रस्ता आदी ठिकणी संचनल करत नागरिकांना कायदा व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या लोकसभा निवडणूकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच निवडणूकीची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम रहावी. तसेत येत्या काळात होळी, रमजान,  छत्रपती शिवाजी महाराज  जयंती यांसारखे अनेक सण उत्सव आहेत. त्या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी हा रूट मार्च काढल्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सांगितले.

यावेळी आर के अवस्ती, सहायक पोलीस निरीक्षक सुरशसिह परदेशी, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, संजय गायकवाड, कृष्णा भोये, आदींसह ७० कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा –

Back to top button