Nandurbar News : लाकडांची वाहतूक रोखली म्हणून जमावाचा वनपथकावर हल्ला, महिला वनरक्षक जखमी | पुढारी

Nandurbar News : लाकडांची वाहतूक रोखली म्हणून जमावाचा वनपथकावर हल्ला, महिला वनरक्षक जखमी

नंदुरबार – लाकडांची तोड करून बैलगाडीतून अवैधपणे वाहतूक करताना आढळले म्हणून कारवाई करताच जमावाने वनखात्याच्या पथकावर हल्ला केला त्यात एक महिला वनरक्षक जखमी झाली. दरम्यान, हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची अधिक माहिती अशी की अक्कलकुवा तालुक्यात कंकाळा माळ (ता. अ.कुवा) शिवारात वन कक्ष क्र. १६३ कोलवीमाळ ते खाई रस्त्यावर वनक्षेत्र अ.कुवा येथील पथक जंगल गस्त घालण्याच्या शासकीय कर्तव्यावर असतांना ८ ते १० अज्ञात इसम अवैधरित्या सागवान व आडजातीचे लाकडांची तोड करून बैल जोडीच्या सहयाने अवैध वाहतूक करतांना आढळले. त्यावर कायदेशिर कारवाई करीत असतांना धिऱ्या विजय वसावे रा. डाबचा ईराईबारीपाडा व त्यांचे सोबत असलेले ८ ते १० इसमांनी लगेच हल्ला केला. यात पथकातील वनरक्षक प्रियंका जेकमसिंग वसावे यांना दुखापत झाली.

ही घटना कळताच पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन, पोलिस उपनिरीक्षक दिपक वडघुले यांनी ताबडतोब भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी वन परिमंडळ अधिकारी कल्पना भिका धात्रक (अंकुशविहीर ता. अ.कुवा ) रा. सोरापाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धिऱ्या विजय वसावे रा. डाबचा ईराईबारीपाडा व त्यांचे सोबत ०८ ते १० अज्ञात इसम यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करून पथकास हाताबुक्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोउनि जितेंद्र महाजन करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button