Nashik News : उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वांधिक ३ हजार १ रुपये भाव, देवळा बाजार समितीच्या निंबोळा उपबाजार आवारात लिलावास प्रारंभ

Nashik News : उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वांधिक ३ हजार १ रुपये भाव, देवळा बाजार समितीच्या निंबोळा उपबाजार आवारात लिलावास प्रारंभ
Published on
Updated on

देवळा ; देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तालुक्यातील निंबोळा येथील उप बाजारात आज सोमवारी दि. ११ रोजी बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते शेत माल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून, शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक ३ हजार १ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला .

देवळा बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाने तालुक्यातील निंबोळा येथे उप बाजार आवार सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी दि. ११ रोजी उप बाजार आवाराचा शुभारंभ करून संचालक मंडळाने या आश्वासनाची पूर्तता केली असून, परिसरातील शेतकऱ्यांना बाजार समितीने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

यावेळी माजी सभापती केदा आहेर म्हणाले की, बाजार समितीच्या ह्या उप बाजार आवारा मुळे परिसराचा विकास होणार असून, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी आपला शेत माल इतरत्र न विकता तो आपल्या हक्काच्या उप बाजारात आणून विकावा यामुळे शेतकऱ्यांची वेळीची व पैशाची बचत देखील होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. केदा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या बाजार समितीच्या उपबाजार आवारात कांदा लिलावाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सभापती योगेश आहेर यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आज खऱ्या अर्थाने मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळाबरोबरच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. नवीन सुरू झालेल्या ह्या उप बाजार आवारा मुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्काची बाजार पेठ उपलब्ध झाली असून, यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, नवीन आवारात व्यापाऱ्यांसाठी शेतमाल साठवूनक करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या विक्री केलेल्या मालाचे रोख पैसे देखील मिळणार असून, आवारात टप्प्या टप्याने शेतकऱ्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात परिसराचा कायापालट देखील होणार असल्याने उपस्थित गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ह्या उप बाजारात पहिल्याच दिवशी उन्हाळा कांद्याची जवळपास सात हजार क्विंटल आवक झाली असून, निंबोळा येथिल माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी जव्हार निकम यांच्या कांद्याला सर्वाधिक 3001 रुपये व सोनू बच्छाव, लखमापूर यांच्या कांद्याला 2001रुपये भाव मिळाला . तर कमीत कमी 500 व सरासरी 1600 रुपये याप्रमाणे कांद्याची खरेदी करण्यात आली .

याप्रसंगी उपसभापती अभिमन पवार, संचालक भाऊसाहेब पगार, दादाजी आहिरे, दिलीप पाटील आदींसह सरपंच प्रदीप निकम, शरद ठाकरे, विकास सोसायटीचे व्हा चेअरमन हिरामण आहिरे, उपसरपंच नितीन निकम, पंडित राव निकम, अशोक थोरात, केदा शिरसाट, किरण पाटील, शिवाजी चव्हाण, जगदीश पवार, कैलास देवरे, संजय गायकवाड, सचिव माणिक निकम, कांदा व्यापारी व कर्मचारी तसेच परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कैलास निकम यांनी केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news