

जळगांव : पुढारी वृत्तसेवा– जागतिक महिला दिनानिमित्त (दि. 08) रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनचा कारभार हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला काम करणा-या महिला अंमलदारांनी पाहिला. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून मपोहेका निलोफर सैय्यद यांनी कामकाज पाहीले. तसेच मपोहेका असताना तडवी यांनी दुय्यम अधिकारी चे कामकाज पाहीले. मपोहेका, सुनंदा तेली यांनी ठाणे अंमलदार म्हणुन काम केले व मपोका सपला येरगुंटला यांनी सीसीटीएनएस चे कामकाज पाहीले. मपोका हसीना तडवी यांनी ऑफिस हजर चे कामकाज केले. तसेच पोलीस स्टेशनला सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे महिला लिलाबाई म्हस्के, निर्मलाबाई तायडे, बनाबाई जाधव व महीला अंमलदार यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सो. यांनी सत्कार केला.