Jalgaon Crime : मित्राच्या रुमवर नेऊन मुलीवर बलात्कार, संशयितास अटक

Jalgaon Crime : मित्राच्या रुमवर नेऊन मुलीवर बलात्कार, संशयितास अटक
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या गेटवरून एका 14 वर्षाच्या मुलीला घेऊन जात एका रूमवर तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शनि पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीचे वय 14 वर्षे दहा महिने इतके आहे.  संशयित हर्षल दीपक सोनवणे (वय  21) राहणार हुल्को कॉलनी, भुसावळ याणे तिला जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या गेट जवळून मोटरसायकलने खेडी तालुका भुसावळ येथे मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला व पुन्हा मोटरसायकलने शाळेत सोडून दिले.

या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news