जळगाव : किराणा दुकानातून चोरट्यांनी लांबवले एक लाख 90 हजाराचे सामान | पुढारी

जळगाव : किराणा दुकानातून चोरट्यांनी लांबवले एक लाख 90 हजाराचे सामान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सावदा फैजपूर रोडवरील डीएन महाविद्यालया समोरील महालक्ष्मी सुपर शॉपमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून एक लाख 90 हजार 795 रुपये किमतीचे चांदीचे नाणे, चांदीच्या मुर्त्या व रोख रक्कम असा एक लाख 90 हजार 795 मुद्देमाल घेऊन पसार झाले  आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदा फैजपूर रोडवरील डी एन महाविद्यालया समोर महालक्ष्मी सुपर शॉप आहे. निलेश मधुकर राणे यांचे ते सुपर शॉप असून चोरट्यांनी महालक्ष्मी सुपर शॉप किराणा दुकानावरील छताचा पत्रा बाजूला करुन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर 29 हजार 575 रुपयाचे ड्रायफूट्स, 7820 रुपये किंमतीचे दाढीचे जिलेट कंपनीचे ब्लेड, 27 हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीचे नाणे व चांदीच्या देवीच्या मूर्ती यासह एक लाख 900 रुपये रोख व २५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर, हार्ड डिस्क असा एक लाख 90 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी सावदा पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Back to top button