धुळे : भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी बाळासाहेब भदाणे 

धुळे : बाळासाहेब भदाणे यांना नियुक्तीपत्र सुपूर्त करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील आदी.
धुळे : बाळासाहेब भदाणे यांना नियुक्तीपत्र सुपूर्त करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील आदी.

धुळे : पुढारी वृत्तसेवा
भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीसपदी बाळासाहेब रावण भदाणे (बोरकुंड) यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते तशा आशयाचे नियुक्तीपत्र बाळासाहेब भदाणे यांना देण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय आदी विविध क्षेत्रात बाळासाहेब भदाणे कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत ही भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल असा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केली. शिरपूर येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात, भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्तीचे नियुक्तीपत्र भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी बाळासाहेब भदाणे यांनी सुपूर्त केले.

यावेळी धुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप राजपुत, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे आदी उपस्थित होते.

भाजपाने माझ्यावर दाखवलेला विश्वास प्रामाणिकपणे सार्थ ठरवेल. भाजपाचे ध्येय धोरणे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली देशहिताची कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करेल –बाळासाहेब भदाणे, नवनियुक्त भाजपा जिल्हा सरचिटणीस.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news