जळगाव : जिल्ह्या तथा विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्या व घर फोड्या यामध्ये सात लाख 53 हजार 284 रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने व किराण सामान अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लग्नसरे असल्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये गर्दी दिसून येत आहे. त्यात शासनाने महिलांसाठी बस सेवा ही फ्री केल्यामुळे महिला प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांचे दागिने चोरत आहे. मात्र जिल्हा पोलीस दलास या ठिकाणी लक्ष देण्यास विसर पडलेला दिसून येत आहे.
जळगाव शहरात दिवसेंदिवस घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. खून, दरोडे हे प्रकार वाढलेले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यात जळगाव पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेले दिसून येत आहे. मोठी घटना झाल्यानंतर संपूर्ण प्रशासन जागे होऊन त्या घटनेच्या मागे पाठपुरावा करीत असते मात्र या घटना होऊ नये म्हणून बस स्थानक व इतर ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याने जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये चोरट्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील शहापूर येथील त्रिवेणी पेट्रोल पंपावर निलेश रतन पवार राहणार जामनेर हे काम करतात. दि. 18 रात्री पेट्रोल पंपावरील एक लाख 93 हजार पाचशे रुपये ची कॅश मोटरसायकल वरून जामनेर कडे घेऊन येत असताना अंदाजे 25 ते 30 वयोगटातील एका मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी घेऊन त्यांना मारहाण करून पसार झाले. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील पांढरथ येथील योगिनी रावण पाटील हल्ली मुक्काम द्वारका नगर जळगाव या लग्न कार्यावरून आल्या होत्या. त्यांनी लग्नात घातलेले सर्व दागिने हे आपल्या पर्समध्ये ठेवलेले होते.गावाकडे जाण्यासाठी त्या भडगाव बस स्टॅन्ड वरून भडगाव ते एरंडोल जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मधून 32 ग्रॅम चपलाहार, 10.30 ग्रॅमच्या नेकलेस आठ ग्रॅम मध्ये तोलंग पाच ग्रॅम वेल असे 2 लाख 83 हजार रुपये दागिने लंपास केले. भडगाव पोलिसात दि.20 रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.
अमळनेर बस स्थानक येथे अंमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील राहणाऱ्या भारतीबाई वसंत पाटील यांच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी 62 हजार 500 रुपये किमतीची बांगडी लांबवली याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील फतेपुर येथे राहणारे मोहन काशिनाथ फिरके हल्ली मुक्काम श्रीराम नगर वांजळा रोड भुसावळ हे जामनेर बस स्थानकात त्याच्या खिशामधून अज्ञात आरोपीने 35 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोने येथील कमलाबाई देविदास पाटील या चोपड्याहून जळगावला बस ने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी 75 हजार रुपये किमतीची बस मध्ये बसतत असताना कापून चोरून नेले. या प्रकरणी चोपडा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जळगाव येथील सिंधी कॉलनी मध्ये राहणारे दीपक तोलाराम हेमानाणी हे दि. 20 रोजी दुपारी गांधी मार्केटचे पाठीमागून जात असताना अज्ञात तीन आरोपी त्या ठिकाणी आले व त्यांनी दीपक हे हेमानाणी यांना पुढून व मागून धक्का मारून त्यांच्या खिशातील 37 हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रावेर येथील विद्यानगर भागातील अक्षय रवींद्र अग्रवाल यांच्या किराणा दुकानाचे लोखंडी गेटचे कुलूप व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून 67 हजार 284 रुपयाचा किराणामाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा :