Nashik News | पतसंस्था संचालकांकडून वृद्धास ३३ लाखांचा गंडा | पुढारी

Nashik News | पतसंस्था संचालकांकडून वृद्धास ३३ लाखांचा गंडा

नाशिक : वृत्तसेवा
मुदत ठेवीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवीवर परस्पर बनावट कर्ज काढून पतसंस्थेच्या संचालकांनी पैशांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महादेव तिक्कस (८१, रा. आडगाव) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात सुकमल नागरी सहकारी पतसंस्थेचे आजी-माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापिकेविरोधात अपहार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

महादेव तिक्कस यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटीतील अमृतधाम येथील सुकमल नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष किशोर बाफना, संचालक मंडळ, व्यवस्थापक श्रद्धा कुलकर्णी, सोनम बसवे व नविन अध्यक्ष अतुल वाघ यांनी संगनमत करून जानेवारी २००६ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान फसवणूक केली. संशयितांनी तिक्कस यांना पतसंस्थेत मुदत ठेव करण्यास सांगितले. चांगला परतावा मिळेल असे सांगितल्याने तिक्कस यांनी लाखो रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या. दरम्यान, संशयितांनी या मुदत ठेवींचे नुतनीकरण करत परस्पर बनावट कर्ज प्रकरण करून कर्जाची रक्कम स्वत: च्या फायद्यासाठी वापरली. तसेच मुदतीनंतर मुदत ठेवीचे पैसेही तिक्कस यांना परत केले नाहीत. पतसंस्था बंद झाल्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिक्कस यांनी संशयितांविरोधात ३३ लाख ६१ हजार ८३५ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button