Mela Terminus Nashik | पुणे, कोल्हापूरसाठी मेळा बसस्थानकावरून सुटणार बस | पुढारी

Mela Terminus Nashik | पुणे, कोल्हापूरसाठी मेळा बसस्थानकावरून सुटणार बस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात नुकतेच प्रवासीसेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित मेळा बसस्थानकातून धावणाऱ्या बसफेऱ्यांचे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाने पुनर्नियोजन केले आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यामध्ये मेळा बसस्‍थानकावरून पुणे, कोल्‍हापूर, छत्रपती संभाजीनगरसह धुळे, जळगावला जाण्यासाठी बसगाड्या सोडल्‍या जातील. तर नवीन सीबीएस बसस्‍थानकावरून परराज्‍यातील अहमदाबाद, सुरतसह अन्‍य मार्गांवर बस सुटणार आहेत. नवीन सीबीएस, महामार्गावरून कसारासह इतर ठिकाणांसाठी बससेवा मिळेल. (Mela Terminus Nashik)

यापूर्वी शहरातील जुने सीबीएस, नवीन सीबीएस आणि महामार्ग बसस्‍थानकावरून बसगाड्या सोडण्यात येत होत्‍या. मेळा बसस्‍थानकाचे काम सुरू असल्‍याने गेल्‍या काही वर्षांपासून हा परिसर बंद अवस्‍थेत होता. त्याचे नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन झाले. या वातानुकूलित बसस्‍थानकावरून लांब पल्ल्‍याच्‍या गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे.

आरक्षण असलेल्यांना प्रतीक्षालय
वातानुकूलित बसगाड्यांतील आगाऊ आरक्षण असलेल्‍या प्रवाशांना वातानुकूलित प्रतीक्षालय सुविधा मेळा बसस्‍थानकावर उपलब्‍ध असेल. (Mela Terminus Nashik)

मेळा बसस्‍थानकावरून सुटणाऱ्या बस (Mela Terminus Nashik)
* पुण्यासाठी वातानुकूलित फलाटावरून विनावाहक शिवशाही, शिवाई, जनशिवनेरी
* स्‍वारगेट, कोल्‍हापूर, महाबळेश्‍वर, हुबळी, बेळगावसाठी वातानुकूलित फलाटावरून बस सुटतील
* पुणे साधी बससह तळेगाव, सासवड, फलटण, नारायणपूर, कोरेगाव, सातारा, मिरज, सांगली आदी
* मालेगावसाठी विनावाहक तसेच साधी बसगाडी. धुळ्यासाठी विनावाहक बस
* चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, धुळे, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, शिरपूर, इंदूर
* जळगाव, शेगाव, नागपूर, अकोला अमरावती.
* भुसावळ, मुक्‍ताईनगर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, खामगाव, अमळनेर, चोपडा, यावल, रावल आदी
* छत्रपती संभाजीनगरसाठी शिवशाही व साधी हिरकणी. येवला, लासलगाव, बुलढाणा.
महामार्ग बसस्‍थानकावरून सुटणाऱ्या बस
* मुंबई, बोरिवली, दादर, ठाणे, कसारा, नालासोपारा, वसई, अर्नाळा
* कल्‍याण, डोंबिवली, वाशी, उरण विठ्ठलवाडी
* पनवेल, अलिबाग, मुरुड, रोहा, महाड, दापोली.
* कोपरगाव, शिर्डी, शनिशिंगणापूर, संगमनेर, नगर.
* पंढरपूर, तुळजापूर, लातूर, विजापूर, बारामती, बीड, श्रीरामपूर, शेवगाव, पैठण आदी
* छत्रपती संभाजीनगर, सिल्‍लोड, अंबड, यवतमाळ, परभणी, जालना
* सटाणा, साक्री, नंदुरबार, अक्‍कलकुवा, खापर, अमरावती
* मालेगाव, धुळे, चोपडा, अंमळनेर, चिखली, बुलढाणा आदी

नवीन सीबीएसवरून सुटणाऱ्या बस (Mela Terminus Nashik)
* त्र्यंबकेश्‍वर, तोरंगण, पिंपळगाव, इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, सिन्नर, करंजी
* कसारा, वसई, मनमाड, नांदगाव, बोलठाण, पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू, जव्‍हार
* वापी, सुरत, अहमदाबाद

जुने सीबीएसवरून सुटणाऱ्या बस
* सप्‍तश्रृंगगड, कळवण, शिवभांडणे, खिराड, मांगीतुंगी
* सुरगाणा, पळसन, बर्डीपाडा, उंबरठाण, खोंबळा, करंजुल, लासलगाव
* हरसूल, ठाणापाडा, पेठ, कसोली, इंदोले आदी
* सटाणा, दोंडाईचा, साक्री, नवापूर.

हेही वाचा:

Back to top button