जळगावमधील युवा संमेलन यशस्वी करण्यासाठी झोकून काम करावे : मंत्री गिरीश महाजन | पुढारी

जळगावमधील युवा संमेलन यशस्वी करण्यासाठी झोकून काम करावे : मंत्री गिरीश महाजन

जळगाव- केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील सागर पार्कवर येत्या गुरूवारी (ता. 15) युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

देशाचे लोकप्रिय गृहमंत्री तथा सहकारमंत्री ना. अमित शहा यांच्या दौऱ्यानिमीत्त जळगाव क्लस्टर नियोजन बैठकीचे आयोजन भाजपच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी (ता.12) दुपारी करण्यात आले होते. त्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री महाजन बोलत होते. उपस्थित मान्यवरांनी बैठकीआधी स्व. उत्तमराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी व नंदकुमार महाजन तसेच भाजपचे प्रदेश सचिव अजय भोळे, खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार मंगेश चव्हाण व सुरेश भोळे आणि भाजपचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थितांना युवा संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी खासदार पाटील तसेच माजी खासदार डॉ. पाटील, आमदार चव्हाण आणि आमदार भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले तर जळकेकर महाराज यांनी आभार मानले.

Back to top button