

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. ते आज ८ फेब्रुवारीला नाशिकमध्ये असून ९ फेब्रुवारीला बीडमध्ये त्यांचा दौरा आहे. तर 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता मराठ्यांची बैठक घेऊन ते आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
भुजबळ हे राजीनाम देणारे नाहीत तर दुस-यांचे राजीनामे घेणारे आहेत. आता काही झाले तरी मंडल आयोगाला चॅलेंज करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सप्तश्रृंगी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारी नंतर सगळे बाहेर काढू असे सांगून त्यांनी गौप्यस्फोटच यावेळी केला आहे.