Nashik | नमो चषक आमदार प्रिमियर लीगमध्ये ‘डॉमीनेटर’ची बाजी

नाशिक : मेरी मैदानावर झालेल्या नमो चषक प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये विजेत्या डॉमिनेटर संघाला करंडक प्रदान करताना आमदार ॲड. राहुल ढिकले. 
नाशिक : मेरी मैदानावर झालेल्या नमो चषक प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये विजेत्या डॉमिनेटर संघाला करंडक प्रदान करताना आमदार ॲड. राहुल ढिकले. 
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नमो चषकांतर्गत नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघात आमदार ॲड. राहुल ढिकले प्रिमियर क्रिकेट लीगमध्ये डॉमीनेटर या संघाने सहा षटकात ७५ धावांचे आव्हान लिलया पेलत ट्रॉफी व एक लाखाचे रोख पारितोषिक पटकवले. डॉमीनेटरच्या फलंदाजाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत ओझर छत्रपती वॉरिअर्स संघावर रोमहर्षक विजय मिळवला.

पंचवटीतील मेरी मैदानावर ३१ ते ४ जानेवारी दरम्यान तलाठी कॉलनीतील शिवनगर मित्रमंडळाने आमदार क्रिकेट प्रिमियर लिग आयोजित केली होती. त्यात महाराष्ट्रभरातून ४०० खेळाडूंनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यातील २२४ खेळाडूंची पाईण्टपद्धतीने १६ संघमालकांनी निवड केली होती. दररोज चार संघ याप्रमाणे चार दिवसात आठ संघांची उपांत्यपुर्व, उपांत्य व अंतिम फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या विजेता छत्रपती वॉरीअर्स या संघाला रोख ७१ हजार व ट्रॉफी, तिसरा विजेता आर्या इलेव्हन यांना ५१ हजार तर चौथ्या क्रमांकावरील विजेता बसवंत वॉरिअर्स यांना ३१ हजाराचे पारितोषिक देण्यात आले. या सामन्यासाठी खास मुंबईतील पंच पॅनल बोलविण्यात आले होते.

पारितोषिक वितरणप्रसंगी आमदार ढिकले, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, मुकेश शहाणे, शंकर हिरे, डॉ. निलेश चव्हाण, पवन कातकाडे, अंकुश वराडे, सोमनाथ वडजे यांची विशेष उपस्थिती होती. आयोजनासाठी अमर बोरसे, शाम महाजन, संतोष आवारे, अक्षय दोंदे, शुभम पाटील यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news