नाशिक : सिन्नरला ५४ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण | पुढारी

नाशिक : सिन्नरला ५४ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या व्यापक आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला. या पाश्र्वभूमीवर सिन्नर येथे महसूल विभागामार्फत मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा ५४ जात प्रमाणपत्रांचे वितरण प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यासंदभनि तालुक्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचों माहिती प्रांताधिकारी पाटील यांनी दिली. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गाव पातळीवर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, जातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रांताधिकारी पाटील यांनी केल्या

दरम्यान, ज्यांच्या कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत, त्या संबंधित नागरिकांना निर्दशनास येण्याच्या अनुषंगाने आढळून आलेल्या कुणबी नोंदी तलाठी यांच्यामार्फत गाव दवंडी देण्यात यावी. त्यानंतर प्रत्येक मंडळ स्तरावर गावांमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देणेकामी शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संबंधित गावाचे महा ई-सेवा केंद्रचालक, आपले सरकार केंद्रचालक यांच्याशी शिबिराअगोदर संपर्क साधून त्यांच्यामार्फत विहीत नमुन्यात कुणची जातीचे दाखल्यांचे प्रस्ताव महा ऑनलाइन पोर्टलवर ऑनलाइन दाखल करावे व संबधित मंडळ अधिकारी यांनी नमुन्यात दाखल जात प्रमाणपत्रांबाबत दैनंदिन अहवाल सादर करावा, अशा सूचना तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केल्या. मंडळ अधिकारी अशोक शिलावटे, तलाठी स्वरुप गोराणे, सेतू व्यवस्थापक सतीश दळवी आदींनी जात प्रमाणपत्र वितरणासाठी परिश्रम घेतले जात प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मंडळनिहाय जात प्रमाणपत्रांचे होणार वितरण
दरम्यान, महसूल विभागाने मंडळनिहाय जात प्रमाणपत्रांचे वितरणाचे नियोजन केले आहे. याबाबत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी संबंधितांना सूचना केली आहे. सिन्नर, पांढुर्ली, सोनांबे, नायगाव, डुबेरे, गोंदे, नांदूरशिंगोटे, याची, शहा, देवपूर, बडांगळी, पांगरी बुद्रुक आदी मंडळांमध्ये दि. १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान ही शिबिरे होणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button