नाशिक ग्रामीण पोलिस दलात ३० बदल्या; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर फेरबदल | पुढारी

नाशिक ग्रामीण पोलिस दलात ३० बदल्या; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर फेरबदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर पोलिस दलात अधिकाऱ्यांचे बदलीसत्र सुरू झाले आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण दलातील पोलिस निरीक्षक व सहायक निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. ग्रामीण पोलिस दलातील २७ निरीक्षकांसह ३० सहायक पोलिस निरीक्षकांच्या घटकांतर्गत बदल्या झाल्या आहेत.

मूळ जिल्ह्यातील अथवा एकाच घटकक्षेत्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा बजावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यानुसार शहर पोलिस दलातील काही दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण दलातील पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांसह अकार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत फेरबदल केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांसह विभागातील तीस सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये सहा अधिकारी हे नव्याने नाशिक ग्रामीणमध्ये हजर झाले आहेत. तर उर्वरित अधिकाऱ्यांची घटकांतर्गत जबाबदारी व पोलिस ठाणे बदल करण्यात आले आहेत.

पोलिस निरीक्षकांची बदली (कंसात बदलीचे ठिकाण)
येवला तालुक्याचे निरीक्षक पांडुरंग पवार (जिल्हा विशेष शाखा), सुनील भाबड (वाहतूक, मालेगाव), मालेगाव तालुक्याचे रवींद्र मगर (आर्थिक गुन्हे), मालेगाव छावणीचे रघुनाथ शेगर (दिंडोरी), मालेगाव कॅम्पचे राजेंद्र भोसले (नियंत्रण), सिन्नरचे राजेंद्र कुटे (दोषसिद्धी शाखा), निफाडचे बापूसाहेब महाजन (मानव संसाधन), नाशिक तालुक्याच्या सारिका अहिरराव (वाडीवऱ्हे), नियंत्रण कक्षाचे सत्यजित आमले (नाशिक तालुका), ओझर विमानतळचे यशवंत बाविस्कर (एमआयडीसी सिन्नर), एमआयडीसी सिन्नरचे श्याम निकम (महिला सुरक्षा), पिंपळगाव बसवंतचे अशोक पवार (ओझर विमानतळ), इगतपुरीचे राजू सुर्वे (स्थानिक गुन्हे), विशेष शाखेचे बाजीराव पोवार (सटाणा), ओझरचे दुर्गेश तिवारी (पिंपळगाव बसवंत), संजय गायकवाड (सुरगाणा), वसंत पथवे (पेठ), येवला शहरचे नंदकुमार कदम (निफाड), आर्थिक गुन्हेचे राहुल तसरे (इगतपुरी) यांसह नव्याने हजर झालेले अरुगण धनवडे (नियंत्रण), राहुल खताळ (मालेगाव तालुका), चंद्रशेखर यादव (सिन्नर), संजय सानप (मालेगाव शहर), शिवाजी डोईफोडे (मालेगाव किल्ला), सोपान शिरसाठ (कळवण), राजेंद्र पाटील (मालेगाव छावणी) आणि विलास पुजारी (येवला शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button