जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार – जिल्हाधिकारी | पुढारी

जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार - जिल्हाधिकारी

जळगाव : जिल्ह्यात मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या आणि गोखले इन्स्टिट्यूटने राबवणाऱ्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी 75 नोडल अधिकारी आणि 8,000 सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सहा दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या नोडल अधिकारी आणि सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोबाइल अॅपमध्ये असलेल्या प्रश्नावलीमध्ये 154 प्लस 25 असे प्रश्न असणार आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये योग्य माहिती द्यावी आणि योग्य ते सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यामध्ये दहा लाख 50 हजार कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण सहा दिवसात पूर्ण करायचे आहे. यासाठी शिक्षकांसह महसूल आणि इतर कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button