

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा-माहेरहून २० लाख रुपये आणत नाही म्हणून संगनमत करून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचे माहेर इंदिरानगर येथे असून, ती दि. ११ जून ते १२ डिसेंबर २०२० या कालावधीत ब्राह्मणगाव टाकळी (ता. कोपरगाव) व कल्याण येथे सासरी नांदत होती. त्या दरम्यान संशयित पती संतोष रंगनाथ गंगावणे, सासरे रंगनाथ गंगावणे, सासू लताबाई गंगावणे व दीर अरविंद गंगावणे (रा. प्रकाश अपार्टमेंट, नांदिवली, कल्याण) यांनी संगनमत करून माहेरहून २० लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेकडे तगादा लावला. तसेच तुला घरकाम येत नाही, या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ, मारहाण करून माहेरी काढून दिले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा