Jalgaon News : शिव महापुराण कथेत हृदयविकाराने महिलेचा मृत्यू | पुढारी

Jalgaon News : शिव महापुराण कथेत हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव येथे सुरू असलेल्या श्रीराम महा शिवपुराण कथेमध्ये एका महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नसुन कुणास काही माहिती असल्यास चाळीसगाव पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील चाळीसगाव येथे मालेगाव रोडला 16 तारखेपासून श्रीराम महा शिवपुराण कथा सुरू आहे. या कथेसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर पोलिस व होमगार्ड कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी (दि.  19) महिलेचा मृतदेह सापडला आहे. तरी महिलेस कोणी ओळखत असतील तर चाळीसगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. महिलेचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे तपासी अंमलदार दत्तात्रय महाजन यांनी डॉक्टरांनी सांगितले असल्याचे सांगितले.

या घटनेआधी बुधवारी (दि. 17) रोजी सायंकाळी बसस्थानकासमोर होमगार्ड सैय्यद हाफिज सैय्यद रऊफ (52, सुरेशदादा नगर, बिल्डींग क्रमांक 29, रूम नंबर 22, गेंदालाल मिल, जळगाव) यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

Back to top button