PM Modi Nashik : पंतप्रधान मोदींचा दोन किलोमीटरचा ‘रोड शो’, कोणत्या वाहनात? | पुढारी

PM Modi Nashik : पंतप्रधान मोदींचा दोन किलोमीटरचा 'रोड शो', कोणत्या वाहनात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरात युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. हॉटेल मिर्ची येथील हेलिपॅड ते सभास्थळ असा साधारण दोन किलोमीटरचा रोड शो आहे. या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूने पंतप्रधानांसाठी सुरक्षा असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या वाहनांमध्ये पंतप्रधान मोदी असलेले वाहन असेल. रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग केलेली आहे. बॅरिकेडिंगबाहेर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो दरम्यान असलेल्या रस्त्यांवर विद्युत रोषणाई केलेली आहे. तसेच सर्व रस्ते सुशोभित केले आहेत. या काळात सर्वच वाहतुकीला मज्जाव केला असून, सायंकाळपासूनच हा सर्व परिसर पोलिस, कमांडो यांनी ताब्यात घेतला आहे. या दरम्यान होत असलेल्या प्रत्येक ठिकाणची मिनिट टू मिनिट माहिती कंट्रोल रूमकडे असणार आहे. रोड शोसाठी झेंडू, गुलाब फुलांच्या पाकळ्या यांचा वापर होणार आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाकडून मोदींच्या घोषणा, फुलांची उधळण होणार आहे. तपोवन येथील सभास्थळावर मोदींचे स्वागत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत.

Back to top button