नंदुरबार : श्रीरामांविषयी वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार | पुढारी

नंदुरबार : श्रीरामांविषयी वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड याने शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिबिरात भाषण करताना समस्त हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीरामांविषयी अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार नंदुरबार पोलीस ठाण्यात येथील हिंदू सहाय्य समिती च्या वतीने दाखल करण्यात आली. (Jitendra Awhad)

हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र परशराम पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार आज (दि. ५) दाखल केली. यावेळी हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, भागवतकर रविंद्र पाठक, उद्योगपती सुरेश अग्रवाल, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, भैय्या मराठे, पंकज डाबी, उज्वल राजपूत, जयेश भोई, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदी उपस्थित होते. (Jitendra Awhad)

तक्रारीत म्हटले आहे की, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता, असे अभद्र आणि अपमानास्पद वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य तद्दन खोटी माहिती देणारे असून समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारोह होत असताना त्यांनी असे विधान करणे हा धार्मिक एकतेला बाधा आणणारे आहे.

हेही वाचा 

Back to top button